साताऱ्यात युवतीच्या पोटात गोळी घातली, दुचाकीवरून आलेल्या तिघांचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 18:45 IST2018-05-31T18:45:49+5:302018-05-31T18:45:49+5:30

येथील बुधवार नाक्यावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एका युवतीवर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला.

In Satara, the victim was shot in the stomach, the trio from the two-wheeler | साताऱ्यात युवतीच्या पोटात गोळी घातली, दुचाकीवरून आलेल्या तिघांचे कृत्य

साताऱ्यात युवतीच्या पोटात गोळी घातली, दुचाकीवरून आलेल्या तिघांचे कृत्य

सातारा : येथील बुधवार नाक्यावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एका युवतीवर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला. यामध्ये संबंधित युवतीच्या पोटात गोळी लागली असून, या युवतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सातारा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अश्विनी कांबळे (वय २०, रा. बुधवार नाका, सातारा) असे जखमी युवतीचे नाव आहे. याबाबाबत अधिक माहिती अशी की, येथील बुधवार नाक्यावर गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अश्विनी कांबळे ही चालत निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिच्यावर गोळीबार केला. यामध्ये अश्विनी गंभीर जखमी झाली. तिच्या पोटामध्ये उजव्या बाजूला गोळी लागली आहे. काही नागरिकांनी संबंधित युवतीला तत्काळ रिक्षाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकाराची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली, त्या पिस्तुलातील पुंगळी घटनास्थळी पोलिसांना सापडली आहे. दरम्यान, अश्विनीवर कोणी व कशासाठी गोळी झाडली? हे अद्याप समोर आले नाही. कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शाहूपुरी पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: In Satara, the victim was shot in the stomach, the trio from the two-wheeler