सातारा : सुरुचीप्रकरणी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 15:07 IST2018-04-25T15:07:00+5:302018-04-25T15:07:00+5:30
सुरुची धुुमश्चकीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी मंजूर केला.

सातारा : सुरुचीप्रकरणी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना जामीन
सातारा : सुरुची धुुमश्चकीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी मंजूर केला.
याबाबत माहिती अशी की, आनेवाडी टोलनाका व्यवस्थापनाच्या हस्तांतरणावरून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सुरुची बंगल्यासमोर खासदार उदयनराजे व आमादार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह समर्थकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, शनिवार, दि. २१ रोजी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या जामिनावर बुधवारी जिल्हा न्यायाधीश अमेथा यांच्यासमोर दोन्ही गटांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायाधीशांनी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.