सातारा : तिहेरी अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीर, दूध वाहतूक करणार टँकर अन् कंटेनर यांच्यात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:16 IST2018-02-05T19:14:34+5:302018-02-05T19:16:47+5:30
फलटण-पुणे रस्त्यावर येथील जिंती नाका परिसरात कंटेनर व दूध टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास झाला.

सातारा : तिहेरी अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीर, दूध वाहतूक करणार टँकर अन् कंटेनर यांच्यात धडक
फलटण (सातारा) : फलटण-पुणे रस्त्यावर येथील जिंती नाका परिसरात कंटेनर व दूध टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास झाला.
याबाबत माहिती अशी की, जिंती नाका रस्त्यालगत सोमवारी सकाळी (एमएच ११ एबी ९८९८) हा मोठा ट्रक उभा होता. त्यावेळी पुणेच्या दिशेने दूध घेऊन जाणारा टँकर (एमएच ११ एएल ५३७५) व पुण्याहून येणारा कंटेनर (एमएच ४६ बीबी १८४५) यांच्यात समोरासमोर धडक झाली.
ही धडक एवढी भीषण होती की कंटेनरचा चक्काचूर झाला. डिझेल टाकीला गळती लागल्यामुळे रस्त्यावरून डिझेल वाहत होते. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन ट्रकलाही धडकले. यामध्ये तिन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.