सातारा : तीन अपघातांत दोन ठार; बारा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:54 AM2018-12-17T10:54:08+5:302018-12-17T10:54:33+5:30

आशियाई महामार्ग ४७ वरील खंडाळा तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातांत दोन जण ठार तर बारा जण जखमी झाले आहेत. ठार झालेले दोघेही पादचारी आहेत.

Satara: Two killed in three accidents; Twelve injured | सातारा : तीन अपघातांत दोन ठार; बारा जखमी

सातारा : तीन अपघातांत दोन ठार; बारा जखमी

Next
ठळक मुद्देतीन अपघातांत दोन ठार; बारा जखमीअपघातांची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला

शिरवळ : आशियाई महामार्ग ४७ वरील खंडाळा तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातांत दोन जण ठार तर बारा जण जखमी झाले आहेत. ठार झालेले दोघेही पादचारी आहेत.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईहून जावळी तालुक्यातील मेढा याठिकाणी निघालेली मिनी बस (एमएच ११ सीएच १६३४) ही पारगाव हद्दीमध्ये असणाऱ्या एका गॅरेजसमोर आली असता बसचालकाचे नियंत्रण सुटून महामार्गालगत उसाने भरलेल्या नंबर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकली.

ही धडक एवढी जोरदार होती की मिनी बसमधील तेवीसपैकी बारा प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

याबाबतची फिर्याद ज्ञानेश्वर अशोक धनावडे यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली आहे. त्याचप्रमाणे शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत केसुर्डी ता. खंडाळा गावच्या हद्दीत एका मंदिरासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत महामार्ग ओलांडणारे पाडळी, ता. खंडाळा येथील अरुण दादू वाघमारे (वय ५५) हे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाले.

शिरवळ हद्दीत एका कृषी मॉलसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अज्ञात पुरुष जातीचे (वय ३५) हे डोक्यावरून चाक गेल्याने जागीच ठार झाले. या अपघातांची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून, शिरवळचे पोलीस हवालदार किशोर नलावडे, स्वप्नील दौंड तपास करीत आहेत.

Web Title: Satara: Two killed in three accidents; Twelve injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.