सातारा : वर्येचं वळण धोक्याचं, अपघातांत वाढ : रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 15:14 IST2018-05-30T15:14:59+5:302018-05-30T15:14:59+5:30
सातारा-वाई मार्गावर असलेल्या वर्ये पुलावरील वळण अपघातांना कारणीभूत ठरू लागलं आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी हे वळण नजरेस पडत नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. धोका टाळण्यासाठी या रस्त्याचे प्रशासनाकडून रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

सातारा : वर्येचं वळण धोक्याचं, अपघातांत वाढ : रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी
सातारा : सातारा-वाई मार्गावर असलेल्या वर्ये पुलावरील वळण अपघातांना कारणीभूत ठरू लागलं आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी हे वळण नजरेस पडत नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. धोका टाळण्यासाठी या रस्त्याचे प्रशासनाकडून रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
सातारा-वाई मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या मार्गावर असलेल्या वर्ये पुलावरील धोकादायक वळण सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. आधीच पूल त्यात धोकादायक वळण असल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनांच्या वेगावरही नियंत्रण नसते.
खंडाळ्यातील एस वळणावर आजपर्यंत शेकडो अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असून, अनेकजण जखमीही झाले आहेत. अशीच काहीशी परिस्थितीत वर्येतील वळणाची झाली आहे. या वळणावर रस्त्याच्या दुतर्फा झाडा-झुडपांचे प्रमाणही वाढले आहे. त्यात अरुंद रस्ता असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना अडचणी निर्माण होतात. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अत्यावश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
वर्ये पुलावरील धोकादायक वळण अपघातांना कारणीभूत ठरत आहे. आजपर्यंत या वळणावर अनेक अपघात घडले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. या मार्गावरील वाहनांची संख्या
पाहता, प्रशासनाने रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे बनले आहे.
- श्रीरंग काटेकर