सातारा : मुंबईहून आटपाडीकडे येणारी ट्रॅव्हल्स उलटली; तीस प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 16:00 IST2018-02-22T15:55:38+5:302018-02-22T16:00:08+5:30
मुंबईहून आटपाडीकडे येणारी ट्रॅव्हल्स वडजल (ता. फलटण) येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटली. यामध्ये तीस प्रवासी जखमी झाले आहेत.

सातारा : मुंबईहून आटपाडीकडे येणारी ट्रॅव्हल्स उलटली; तीस प्रवासी जखमी
फलटण : मुंबईहून आटपाडीकडे येणारी ट्रॅव्हल्स वडजल (ता. फलटण) येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटली. यामध्ये तीस प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून आटपाडीकडे येणारी ट्रॅव्हल्स (एमएच ०७ एडी २१२१) ही वडजल ते वाठार फाटा येथे पहाटे सव्वाचारच्या सुमारास आली असता पुलाच्या कठड्यास ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की जागेवरच ट्रॅव्हल्स उलटली. यामध्ये ३० प्रवासी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रुग्णवाहिकेने जखमी प्रवाशांना फलटण येथील खासगी रुग्णालयात धाखल केले. संतोष पवार (वय ३६ रा. पवारवाडी, वडूज, ता. खटाव) तसेच अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे.