सातारा : ट्रॅक्टर एक... मुंगळे तीन, ऊस वाहतूक सुसाट, कर्णकर्कश गाण्यांमुळे अपघातांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:03 IST2018-12-10T14:00:15+5:302018-12-10T14:03:10+5:30
फलटण तालुक्यात तीन कारखान्यांची धुराडी पेटून महिना झाला तरी वाहनचालकांना आवश्यक त्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरचालक टेपरेकॉर्डचे कर्णकर्कश आवाज करून ऊस वाहतूक करत आहेत. एका ट्रॅक्टरला चार ट्रॉल्या, तर कधी एका ट्रॅक्टरला तीन मुंगळे जोडले जात आहेत. वळणावर ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत.

सातारा : ट्रॅक्टर एक... मुंगळे तीन, ऊस वाहतूक सुसाट, कर्णकर्कश गाण्यांमुळे अपघातांमध्ये वाढ
आदर्की : फलटण तालुक्यात तीन कारखान्यांची धुराडी पेटून महिना झाला तरी वाहनचालकांना आवश्यक त्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरचालक टेपरेकॉर्डचे कर्णकर्कश आवाज करून ऊस वाहतूक करत आहेत. एका ट्रॅक्टरला चार ट्रॉल्या, तर कधी एका ट्रॅक्टरला तीन मुंगळे जोडले जात आहेत. वळणावर ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत.
आदर्की फाटा-फलटण मार्गावर कोल्हापूर, कऱ्हाड , सातारा, सुरवडी, फलटण, बारामती, पंढरपूर शहर व औद्योगिक वाहतूक या मार्गावरून होते. तर आॅक्टोबर ते जून महिन्याच्या दरम्यान ऊस वाहतूक टॅक्टर ट्रॉली, छकडा (मुंगळा) मधून होते. शेणखताचीही वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते.
ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टरचालक कर्णकर्कश आवाजात गाणी लावून असतात. जादा ऊस भरण्याची स्पर्धा चालकांमध्ये सुरू असते. त्यातूनच या मार्गावर फलटण पूल, हणमंतवाडी घाट, दस्तुरी चढ-उतार, बामण कडा, कापशी, पॉवर हाऊस चढ, नाना घोल उतार, घाडगेवाडी-मिरगावपर्यंत चार ते पाच ठिकाणी चढ-उतार आहेत. वळणावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे. नियंत्रण सुटल्यास पुलावरून ट्रॅक्टर पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
वाहतुकीमुळे दुसऱ्या वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. या रस्त्यावर दहा ते बारा अरुंद, कठडे तुटलेले पूल आहेत. कारखाना व्यवस्थापन व वाहतूक पोलिसांनी धोकादायकरीत्या वाहतूक करणाºया चालकांना समज देण्याची मागणी होत आहे.