सातारा : वर माती, खाली वाळू... प्रशासन मात्र कनवाळू, वाळूचोरीचा नवा फंडा, खटाव तालुक्यात एका पावतीवर दोन खेपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:46 AM2018-01-30T10:46:36+5:302018-01-30T10:52:28+5:30

खटाव तालुक्यातील नदी पात्रातून वाळू उपसा खुलेआम सुरू आहे. वाळू माफीयांनी नवा फंडा शोधून काढला आहे. खाली वाळू भरून वरुन माती टाकून वाहतूक केली जात आहे. महसूल विभाग मात्र हातावर हात ठेऊन गप्प आहे. वाळू तस्करांवर किरकोळ कारवाई करत प्रशासन ह्यतू कर रडल्यासारखे मी करतो मारल्याह्णसारखे असा खेळ खेळत आहे.

Satara: On top of the clay, sand down ... Administration, however, with renewal, new fund of sand pumps, two crops on a receipt in Khatav taluka | सातारा : वर माती, खाली वाळू... प्रशासन मात्र कनवाळू, वाळूचोरीचा नवा फंडा, खटाव तालुक्यात एका पावतीवर दोन खेपा

सातारा : वर माती, खाली वाळू... प्रशासन मात्र कनवाळू, वाळूचोरीचा नवा फंडा, खटाव तालुक्यात एका पावतीवर दोन खेपा

Next
ठळक मुद्देवर माती, खाली वाळू... प्रशासन मात्र कनवाळूवाळूचोरीचा नवा फंडा खटाव तालुक्यात एका पावतीवर दोन खेपा

कातरखटाव (सातारा) : खटाव तालुक्यातील नदी पात्रातून वाळू उपसा खुलेआम सुरू आहे. वाळू माफीयांनी नवा फंडा शोधून काढला आहे. खाली वाळू भरून वरुन माती टाकून वाहतूक केली जात आहे. महसूल विभाग मात्र हातावर हात ठेऊन गप्प आहे. वाळू तस्करांवर किरकोळ कारवाई करत प्रशासन तू कर रडल्यासारखे मी करतो मारल्यासारखे असा खेळ खेळत आहे.

तालुक्यातील नद्यांवर वाळू तस्कारांचेच राज्य आहे. हे वाळू तस्कर म्हणजे त्या त्या भागातले गावपुढारी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. राजकीय वरदहस्त व महसूल अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधाच्या जोरावर वाळूवर दरोडा टाकण्याचा कारभार दिवसा ढवळ्या तसेच रात्रीच्या अंधारात सुरू आहे.

नद्यांना पाणी असो अथवा नसो अत्याधुनिक यंत्र सामुग्री वापरत वाळू उपसा केला जातोच. लाखो रुपयांची वाळू काढली जाते. परंतु वाळू उपसा करणाऱ्यांवर मात्र कुठलीच ठोस कारवाई का होत नाही असा सवाल विचारला जात आहे. खटाव तालुक्यातील वाळुवर उंब्रज, कऱ्हाड, चिपळूण भागातील वाळु सम्राटांचा भलताच जीव जडल्याचे बोलले जाते.

नाव गाळाच....!

गाळमुक्त तलाव या शासनाच्या योजनेतून गाळाचा उपसा केला जात आहे. नेमका याच संधीचा फायदा घेत वाळु तस्करांनी तलावाकडेला निघणारी वाळु काठोकाठ अन् त्यावर गाळाचा थर देत वाळू वाहतुकीचा नवा फंडा वापरला आहे.

Web Title: Satara: On top of the clay, sand down ... Administration, however, with renewal, new fund of sand pumps, two crops on a receipt in Khatav taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.