शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : पठारावरील गवताची कुरणं बनतायत वणव्याचे भक्ष्य, वनसंपदा धोक्यात : यवतेश्वर, कास, बामणोली परिसरांत जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:36 IST

शहराच्या पश्चिमेकडील डोंगर माथ्यावर असणारा कास परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. पठारावर मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यांवर येथील पशुधन पोसतं. एवढेच कायपण येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागांतील जनावरांची भूकही भागते. अशा या सोनेरी परिसराला आता मात्र विघ्नसंतुष्टांची नजर लागली असून, वणवे लावून गवताच्या कुरणांची राख करण्यात ही अविवेकी प्रवृत्ती असणारी मंडळी धन्यता मानताना दिसत आहे. विघ्नसंतोषी मंडळीच्या मतीचा कलंक झडला तरच पठारावर गवताचे कोंब फुटतील, अशी भावना शेतकºयांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपरिसरात ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकारयवतेश्वर, कास, बामणोली पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने शेतीबरोबर पशुपालनगावातील जनावरांवरही अर्धपोटी राहण्याची वेळ वनसंपदा धोक्यात परिसरांत जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न बिकट

पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील डोंगर माथ्यावर असणारा कास परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. पठारावर मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यांवर येथील पशुधन पोसतं. एवढेच कायपण येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागांतील जनावरांची भूकही भागते.

अशा या सोनेरी परिसराला आता मात्र विघ्नसंतुष्टांची नजर लागली असून, वणवे लावून गवताच्या कुरणांची राख करण्यात ही अविवेकी प्रवृत्ती असणारी मंडळी धन्यता मानताना दिसत आहे. विघ्नसंतोषी मंडळीच्या मतीचा कलंक झडला तरच पठारावर गवताचे कोंब फुटतील, अशी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.यवतेश्वर, कास, बामणोली या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने शेतीबरोबर पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसेच येथील संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अंवलबून असल्याने उदरनिर्वाहासाठी शेतकरी गुरे सांभाळताना दिसतात. गुरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे.

सध्या या परिसरात ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील जनावरांनाही पोसणारा हा चारा नष्ट होत असल्यामुळे पठारावरील गावातील जनावरांवरही अर्धपोटी राहण्याची वेळ येऊ लागली आहे.या प्रवृत्तीला वेळीच रोखले नाही तर भविष्यात पश्चिमेकडील गावातील जनावरांना जगविण्यासाठी इतरांकडे चाऱ्यांसाठी मदत मागण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगforestजंगल