पोहरा-चिरोडी जंगलात पेटू लागले वणवे

By admin | Published: April 18, 2016 11:55 PM2016-04-18T23:55:23+5:302016-04-18T23:55:23+5:30

वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळातील इंदला बिटमध्ये सोमवारी वणवा भडकला.

The fennel in the fir-tree | पोहरा-चिरोडी जंगलात पेटू लागले वणवे

पोहरा-चिरोडी जंगलात पेटू लागले वणवे

Next

वनविभाग सज्ज : दोन रेंजमध्ये आतापर्यंत दोनदा लागल्या किरकोळ आगी
अमोल कोहळे पोहरा बंदी
वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळातील इंदला बिटमध्ये सोमवारी वणवा भडकला. यामुळे वनकर्मचारी खडबडून जागे झालेत. आतापर्यंत या दोन्ही वन वर्तुळात दोन वेळा किरकोळ आगी लागल्यात. त्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वणव्याचा सामना करण्यास वनविभाग सज्ज झाला आहे.
आगी लावणाऱ्या संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश वनविभागाने संबंधित वनकर्मचाऱ्यांना दिले आहेत. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर ती भडकण्यापूर्वीच आटोक्यात आणण्यासाठी दोन्ही रेंजचे वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचतात. पोहरा वर्तुळातील इंदला बिटमधील ७० कंपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी आग लागताच वडाळीचे प्रभारी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, सहायक वनसंरक्षक एस.डी.सोनोने, वनपरीक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर, पोहरा वर्तुळाचे वनपाल विनोद कोहळे, इंदला बिटचे वनरक्षक शेंडे, वनरक्षक मनोज ठाकूर, खडसे, देशमुख, नैतनवार, वनमजूर बाबाराव पळसकर, दीपक नेवारे, किशोर धोटे, चव्हाण घटनास्थळी पोहोचले. आगीमुळे वन्यप्राण्यांना धोका पोहोचला नाही. मात्र, ही आग गुराखी अथवा शिकाऱ्यांनी लावली असावी, असा कयास वनविभागाने लावला आहे. याप्रकरणी वनविभागाने अज्ञात आरोपीविरूध्द १०३/२४ व २६ भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २४ (१) (ब) तसेच कलम २६ (१) (ब) अन्वये गुन्हा नोंदविला. वडाळी, बडनेरा व पोेहरा वनवर्तुळातील वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. अग्निशमन दलाची चमूदेखील घटनास्थळी पोहोचली होती. यापूर्वी चिरोेडी वनपरिक्षेत्रात साधारणत: आठवड्यापूर्वी आग लागली होती.

Web Title: The fennel in the fir-tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.