सातारा : एमआयडीसीत सात लाखांच्या चहा पावडरची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:56 IST2018-11-14T16:55:44+5:302018-11-14T16:56:42+5:30
सातारा : एमआयडीसीतील चहा कंपनीच्या गोदामातून सोमवारी मध्यरात्री ६ लाख ९७ हजार ९१५ रुपये किमतीच्या चहा पावडरची चोरी झाली. ...

सातारा : एमआयडीसीत सात लाखांच्या चहा पावडरची चोरी
सातारा : एमआयडीसीतील चहा कंपनीच्या गोदामातून सोमवारी मध्यरात्री ६ लाख ९७ हजार ९१५ रुपये किमतीच्या चहा पावडरची चोरी झाली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जैमिन दिलीप शहा (वय ३०, रा. सदर बझार) यांची एमआयडीसीत श्री जी ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून ते सोसायटी चहाची विक्री करत असतात. कंपनीच्या गोदामाची चावी कामगारांकडे असते.
सोमवारी मध्यरात्री कामगारांनी गोदामाचे शटर उघडून चहा पावडरचे १६७ बॉक्स चोरले. त्या गोदामातील सुमारे ६ लाख ९७ हजार ९१५ रुपयांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. जी. ढेकळे करीत आहेत.