शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Satara: "ईडीच्या भीतीनं पक्षांतराचं माॅडेल चालणार नाही; महायुतीचा विधानसभेला पराभव निश्चित", पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनावले

By नितीन काळेल | Updated: July 22, 2024 19:42 IST

Prithviraj Chavan Criticize BJP: आतापर्यंत भाजपने इडीच्या कारवाया केल्या. पण, एकाचाही निकाल लागलेला नाही. यापुढे ईडीची भीती दाखवून पक्षांतर करायला लावायचं माॅडेल चालणार नाही. विधानसभेला महायुतीचा पराभव निश्चीत आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

- नितीन काळेल सातारा - भाजपच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठोकाठोकीची भाषा करतात. असे वक्तव्य त्यांना शोभणारे नाही. त्यांना याबद्दल काही वाटत असेल तर राजीनामा द्यावा. त्याचबरोबर आतापर्यंत भाजपने इडीच्या कारवाया केल्या. पण, एकाचाही निकाल लागलेला नाही. यापुढे ईडीची भीती दाखवून पक्षांतर करायला लावायचं माॅडेल चालणार नाही. विधानसभेला महायुतीचा पराभव निश्चीत आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, उदयसिंह पाटील, मनोहर शिंदे, निवास थोरात, अन्वर पाशाखान आदी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. कारण, देशभरात वर्षात जेवढ्या शेतकरी आणि मजुरांच्या आत्महत्या होतात. त्यातील ३७ ते ३८ टक्के आत्महत्या या महाराष्ट्रातील असून मागील तीन वर्षात ते दिसूनही आले आहे. यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात राज्यात १२६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. यामध्ये अमरावती विभाग पुढे आहे. हे राज्यासाठी भूषणावह नाही. केंद्र शासनानेही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. दरडोई उत्पन्नातही महाराष्ट्र देशात १४-१५ व्या क्रमांकावर घसरलाय.

आयएएस प्रशिक्षणाऱ्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी प्रमाणपत्रे दिली. याबाबत दिल्लीतही गुन्हा नोंद झाला आहे. खरेतर केंद्र शासनाच्या डीओपीटी मंत्रालया अंतर्गत युपीएसी काम करते. या मंत्रालयाचे मंत्रीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. खेडकर प्रकरणात त्यांची जबाबदारी काहीच नाही का असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, युपीएससीच्या अध्यक्षांनीही राजीनामा दिलाय. ते गुजरातमधीलच आहेत. आणखी सहा वर्षे त्यांचा कार्यकाल असताना त्यांनी राजीनामा का दिला. पूजा खेडकर प्रकरणात ते जबाबदारी टाळणार का हा प्रश्न आहे. सरकारचाच हा गलथान कारभार आहे. याची सीबीआय चाैकशीच झाली पाहिजे. कारण, महाराष्ट्रात आज हजारो विद्याऱ्थी युपीएससीला बसतात. आई-वडिल जमिनी आणि दागिने गहान ठेवतात. त्यांच्या भवितव्याशी हा खेळच आहे.

महायुतीचा पराभव होईल असे उमेदवार देऊ; पाटणला आघाडीचा विजयपत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, आघाडीत विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत थोडी चर्चा झाली आहे. पण, महायुतीचा पराभव होईल या निकषावर आघाडी उमेदवार देईल. या निवडणुकीत महायुतीचा पराभव ठरलेला आहे. तसेच त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातही आघाडीचा विजय होईल, असा दावाही केला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMahayutiमहायुतीSatara areaसातारा परिसर