सातारा : शिक्षकांना मिळणार वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ, गुरुदक्षिणा : शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन जाहीर केला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 15:51 IST2018-01-12T15:48:50+5:302018-01-12T15:51:39+5:30

ज्ञानदानाचे कार्य १२ वर्षांपूर्वीपासून करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीची गुरुदक्षिणा मिळणार आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी बैठक घेऊन शिक्षकांना याबाबतची माहिती दिली. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे, सरचिटणीस राजेंद्र बोराटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकंच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी २१ आॅक्टोबर २०१७ पूर्वी सेवेची १२ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Satara: Teachers get benefit of senior salary hikes, Gurudakshina: Education officials announce meeting and announcement | सातारा : शिक्षकांना मिळणार वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ, गुरुदक्षिणा : शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन जाहीर केला निर्णय

सातारा : शिक्षकांना मिळणार वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ, गुरुदक्षिणा : शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन जाहीर केला निर्णय

ठळक मुद्दे शिक्षकांना मिळणार वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ, गुरुदक्षिणा शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन जाहीर केला निर्णय

सातारा : ज्ञानदानाचे कार्य १२ वर्षांपूर्वीपासून करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीची गुरुदक्षिणा मिळणार आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी बैठक घेऊन शिक्षकांना याबाबतची माहिती दिली.

सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे, सरचिटणीस राजेंद्र बोराटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकंच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी २१ आॅक्टोबर २०१७ पूर्वी सेवेची १२ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या रोष्टरमध्ये आलेल्या आक्षेपांबाबतची सुनावणी सध्या सुरू असून, त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यात रिक्त असलेली मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे बढतीने त्वरित भरण्यात येणार आहे.

अपंग शिक्षकांच्या प्रमाणपत्राच्या पुनर्पडताळणीबाबत ६३ शिक्षकांचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे, उर्वरित शिक्षकांच्या पडताळणीचा अहवला सिव्हिल सर्जनमार्फत मागविला आहे. त्याची नोंद सेवा पुस्तकांमध्ये केली जाणार आहे.

हे झालेत निर्णय

  1. - आॅक्टोबर २०१७ ग्रामपंचायत निवडणुकीचा भत्ता बँकेत वर्ग होणार
  2. - कमी पटाच्या १३ शाळांचे समायोजन नजीकच्या शाळेत
  3. - निवडश्रेणी मंजूर करण्यात येणार
  4. - शाळांच्या बांधकामासाठी प्रलंबित निधी देणार
  5. - डीमडेट प्रकरणे मार्गी लावणार
  6. - अंशदायी पेन्शन कपातीच्या पावत्या शिक्षकांना देण्यात येतील
  7. - पुर्नचित अभ्यासक्रम प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे मिळणार
  8. - आॅफलाईन बिले सादर करण्यासाठी तालुका पातळीवर डीटीपी आॅपटरेटर

Web Title: Satara: Teachers get benefit of senior salary hikes, Gurudakshina: Education officials announce meeting and announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.