सातारा तालुका पोलिसांचा तीन जुगार अड्ड्यांवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST2021-07-01T04:26:44+5:302021-07-01T04:26:44+5:30

सातारा : सातारा तालुका पोलिसांनी तीन ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले. तसेच ...

Satara taluka police raids three gambling dens | सातारा तालुका पोलिसांचा तीन जुगार अड्ड्यांवर छापा

सातारा तालुका पोलिसांचा तीन जुगार अड्ड्यांवर छापा

सातारा : सातारा तालुका पोलिसांनी तीन ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले. तसेच तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील शेंद्रे ते बोगदा रस्त्यावर एका शिवारातील पत्रा शेडच्या आडोशास जुगार सुरू होता. पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण ६४२ रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी विशाल जयवंत नावडकर (रा. सोनगाव तर्फ सातारा, ता. सातारा) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. वडूथ येथे एका जनावरांच्या गोठ्याच्या आडोशास जुगार अड्डा सुरू होता. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून ६८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मनोज राजेंद्र गुप्ते (रा. शाहूपुरी, सातारा) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर तिसरी कारवाई नागेवाडीच्या हद्दीत करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांनी २०७२ रुपयांचा ऐवज जप्त केला. तर अभिजित ज्ञानदेव पवार (वय २५, रा. मर्ढे, ता. सातारा याच्यावर गुन्हा नोंद केला.

................................................................

Web Title: Satara taluka police raids three gambling dens