सातारा : तडीपार गुंड मंगेश जगतापला अटक, सातारा पोलिसांनी रचला सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 15:27 IST2018-05-30T15:27:31+5:302018-05-30T15:27:31+5:30
तडीपार गुंड मंगेश जगन्नाथ जगताप (वय ३५, रा. शाहूनगर, गोडोली) सातारा शहर पोलिसांनी अटक केली.

सातारा : तडीपार गुंड मंगेश जगतापला अटक, सातारा पोलिसांनी रचला सापळा
ठळक मुद्देसातारा पोलिसांनी रचला सापळा तडीपार गुंड मंगेश जगतापला अटक
सातारा : तडीपार गुंड मंगेश जगन्नाथ जगताप (वय ३५, रा. शाहूनगर, गोडोली) सातारा शहर पोलिसांनी अटक केली.
याबाबत माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आरोपी मंगेश जगताप याला सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
या आदेशाचे उल्लंघन करून तो मंगळवारी रात्री गोडोली परिसरात आला होता. याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळताच सापळा रचून त्याला अटक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पोरे यांनी फिर्याद दिली.