फलटण (सातारा) : दारूच्या आहारी गेलेल्या युवकाला दारू सोडविण्यासाठी फलटण तालुक्यातील वडजल येथील खासगी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या तरुणाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. याबाबत माहिती अशी की, वडजल येथील दारू व्यसनमुक्ती केंद्रात योगेश किसन चांदोरकर ( वय ३२, रा. अशोकनगर किल्ला, रोहा, जि. रायगड) यांना सोमवार, दि. २ रोजी सकाळी अकरा वाजता दाखल केले होते. मंगळवारी दुपारी एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता योगेशच्या नातेवाइकांना फोन करून योगेशचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्याचे नातेवाईक बुधवारी सकाळी वडजल येथे आले.योगेशच्या अंगावर जखमा असल्याने अघोरी उपचार झाल्याचा आरोप नातेवइकांनी केला. या प्रकरणाची चौकशी करावी तोपर्यंत आम्ही योगेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. यावेळी फलटण उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
सातारा : व्यसनमुक्त केंद्रात दाखल झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 13:54 IST
दारूच्या आहारी गेलेल्या युवकाला दारू सोडविण्यासाठी फलटण तालुक्यातील वडजल येथील खासगी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या तरुणाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
सातारा : व्यसनमुक्त केंद्रात दाखल झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
ठळक मुद्देव्यसनमुक्त केंद्रात दाखल झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यूशरीरावर जखमा : वडजलमध्ये तणाव: चौकशीची मागणी