सातारा : वीजबिल भरूनही पुरवठा खंडित शेतकरी अडचणीत; पैसे घेऊन ठेकेदाराचा कर्मचारी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:32 PM2018-09-28T13:32:07+5:302018-09-28T13:34:01+5:30

आदर्की (सातारा) : हिंगणगाव परिसरात पावसाने ओढे दिल्याने पिके वाळायला लागली आहेत. धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने कोट्यवधींचे नुकसान टळले असते; पण वीज कंपनीच्या एका कर्मचाºयाने वीज बिलापोटी हजारो रुपये घेऊन पोबारा

Satara: Supply disbursed by electricity bills in distress; Contractor's Employee Expired With Money | सातारा : वीजबिल भरूनही पुरवठा खंडित शेतकरी अडचणीत; पैसे घेऊन ठेकेदाराचा कर्मचारी पसार

सातारा : वीजबिल भरूनही पुरवठा खंडित शेतकरी अडचणीत; पैसे घेऊन ठेकेदाराचा कर्मचारी पसार

googlenewsNext
ठळक मुद्देऊस, कांदा, मका आदी पिके सुकल्याने शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसानकंपनीचे अधिकारी त्या संबंधित कर्मचाºयाशी आमचा काहीही संबध नसल्याचे सांगत असल्याने व मुख्यमंत्री कृषी योजनेतून एक हप्ता भरून घेतला

आदर्की (सातारा) : हिंगणगाव परिसरात पावसाने ओढे दिल्याने पिके वाळायला लागली आहेत. धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने कोट्यवधींचे नुकसान टळले असते; पण वीज कंपनीच्या एका कर्मचाºयाने वीज बिलापोटी हजारो रुपये घेऊन पोबारा केला. वीज कंपनीचे कर्मचारी कृषिपंपाची वीजपुरवठा खंडित करीत असल्याने शेती अडचणीत येत आहेत. 
वीजवितरण कंपनीचे अधिकारी त्या संबंधित कर्मचाºयाशी आमचा काहीही संबध नसल्याचे सांगत असल्याने व मुख्यमंत्री कृषी योजनेतून एक हप्ता भरून घेतला आहे. 

फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील हिंगणगाव येथे हजारो एकर क्षेत्र बागायती आहे. पण तीन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने ऊस, कांदा, मका आदी पिके सुकल्याने शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.हिंगणगाव परिसरात धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून ओढ्यांना पाणी सोडल्याने पिके वाचणार असल्याने शेतकरी समाधानी झाला. पण वीजवितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी कृषिपंपाची थकीत वीजबिले असल्याचे सांगून कोणतीही पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित करीत आहेत.

यापैकी काही शेतकºयांनी वीज कंपनीकडे काम करणाºया कर्मचाºयाकडे वीज बिलापोटी हजारो रुपये दिले आहेत. त्या कर्मचाºयाने भरणा न करता पोबारा केला. याबाबत शेतकºयांनी लोणंदच्या वीजवितरण कार्यालयात विचारणा केली असता ह्यतो कर्मचारी ठेकेदाराने नेमला होता. त्याचा व वीजवितरण कंपनीचा काही संबंध नाही. त्याचे नावे पोलीस स्टेशनला तक्रार द्या,ह्ण असा सल्ला देण्यात आला. 

 

हिंगणगाव येथे काम करणारा कर्मचारी वीजवितरण कंपनीचा नव्हता. वीजवितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी वीज बिलापोटी रक्कम स्वीकारत नाही. तशा सूचना दिल्या आहेत. वीज ग्राहकांनी, बिल भरणा केंर्द्र, बँक, पोस्ट आॅफिस किंवा आॅनलाईन बिले भरावीत.
- सचिन कोरडे,  उपअभियंता,  वीजवितरण कार्यालय, लोणंद

Web Title: Satara: Supply disbursed by electricity bills in distress; Contractor's Employee Expired With Money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.