Satara: फलटण शहरातील पिता पुत्रांचा एकापाठोपाठ आकस्मित मृत्यू,शहरात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 12:22 IST2023-07-09T12:21:45+5:302023-07-09T12:22:55+5:30
Satara: फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या पितापुत्रांनच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होत असून अद्याप मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.

Satara: फलटण शहरातील पिता पुत्रांचा एकापाठोपाठ आकस्मित मृत्यू,शहरात हळहळ
- नसीर शिकलगार
सातारा - फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या पितापुत्रांनच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होत असून अद्याप मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.
फलटण शहरात गजानन चौक येथे राहणारे हनुमंतराव रामभाऊ पोतेकर( वय 55) आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर (वय 32 )यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले त्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी पिल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव ,मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता पहाटे हनुमंतराव पोतेकर व त्यानंतर पंधरा मिनिटांनी अमित पोतेकर यांचे निधन झाले त्यांच्या मुलीची तब्येत सुधारली असून नक्की मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजू शकलेले नाही विषबाधेमुळे मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला हे शव विच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल या पिता पूत्रांच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे