शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सातारा : जिल्ह्यात कडकडीत बंद; प्रवाशांचे अतोनात हाल. आंबेडकरवादी जनतेचा सातारा शहरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 1:58 PM

सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड , फलटण, वाई या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. करंजे (सातारा) येथे रिक्षाच्या काचा फोडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याठिकाणी पोलिस आणि जमाव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

ठळक मुद्देएसटी बसेस बंद राहिल्याने सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासी अडकूनकरंजे (सातारा) येथे रिक्षाच्या काचा फोडल्याने तणावाची परिस्थिती

सातारा : जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड , फलटण, वाई या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. करंजे (सातारा) येथे रिक्षाच्या काचा फोडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याठिकाणी पोलिस आणि जमाव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

मांढरदेव यात्रा तसेच यमाई यात्रेतील रथोत्सव यामुळे पोलिस फौजफाटा कमी असला तरी होमगार्डसच्या मदतीने जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवला असून, नागरिकांना शांततेचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरेगाव-भीमा येथील तणावानंतर मंगळवारपासून सातारा जिल्ह्यातही तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. काही लोक अफवा पसरवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली नव्हती; पण तणावाची स्थिती लक्षात घेऊन तासाभरात शाळा सोडण्यात आल्या.

एसटी बसेस बंद राहिल्याने सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासी अडकून पडले होते. दरम्यान, आंबेडकरवादी जनतेने सातारा शहरात निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढला.सातारा शहरातील करंजे पेठेतील बुद्ध विहार परिसरात बुधवारी सकाळी रिक्षाच्या काचा फोडणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याठिकाणी जमाव पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. सातारा शहरात बंदचे आवाहन करत युवकांनी मोटारसायकल रॅली काढली.

कऱ्हाडात प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करून प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी शांततेचे आवाहन केले. ओगलेवाडी, कऱ्हाड  येथे झालेल्या तोडफोडीप्रकरणी शंभरच्यावर अनोळखी व्यक्तींवर शहर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून शांतता भंग केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई सुरू केली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे यांनी सातारा शहरात फिरून लोकांना शांततेचे आवाहन केले. पार्थ पोळके व इतर कार्यकर्त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सुरवडी (ता. फलटण) येथे घोषणाबाजी झाली. निंभोरेत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मागणीत निषेध मोर्चा काढण्यात आला. तरडगाव, कोयना भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला.ठळक घडोमोडी

  1.  कऱ्हाडात शांतता समितीची बैठक
  2.  बसस्थानकात प्रवासी अडकले
  3.  शाळा महाविद्यालयांना तासाभरात सुटी
  4.  बुद्धविहार (करंजे) येथे रिक्षा फोडली
  5. काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
  6.  पोलिसांनी घेतली होमगार्डसची मदत
टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावSatara areaसातारा परिसर