सातारा : दुचाकी घसरून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:15 IST2018-11-21T13:15:19+5:302018-11-21T13:15:49+5:30
येथील चार भिंती रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरून जखमी युवकाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सातारा : दुचाकी घसरून एक ठार
सातारा : येथील चार भिंती रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरून जखमी युवकाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. लक्ष्मण तानाजी बनसोडे (वय ३७, रा. फॉरेस्ट कॉलनी, गोडोली) असे मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, लक्ष्मण बनसोडे नगरपालिका शाहू चौकातून शाहू नगरकडे जात होता. चार भिंती परिसरात वळणावर दुचाकी घसरल्याने लक्ष्मणच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.