Satara: धक्कादायक घटना; शाळेसमोरील बोळात शाळकरी मुलीवर अत्याचार, तरुणाला अटक
By दत्ता यादव | Updated: August 27, 2023 15:15 IST2023-08-27T15:14:27+5:302023-08-27T15:15:12+5:30
Satara Crime News: शाळेसमोरील बोळात एका १५ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

Satara: धक्कादायक घटना; शाळेसमोरील बोळात शाळकरी मुलीवर अत्याचार, तरुणाला अटक
- दत्ता यादव
सातारा - शाळेसमोरील बोळात एका १५ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
प्रथमेश पवार (वय १९, रा. डबेवाडी, ता. सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १५ वर्षांची असून, संशयित प्रथमेश पवार हा घटनेदिवशी तिच्या शाळेच्या परिसरात गेला. मुलीला फूस लावून त्याने शाळेसमोरीलच बोळात तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी राहत्या घरातही मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकाराची माहिती पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर आईने शनिवार, दि. २६ रोजी रात्री सात वाजता सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संशयित प्रथमेश पवार याच्यावर अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे अधिक तपास करीत आहेत.