शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

सातारा : हजारो कार्यकर्त्यांसह शिवेंद्रसिंहराजे भोसले पोलीस मुख्यालयात, पोलीस अधीक्षकांसोबत बंद खोलीत चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 12:24 PM

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुचि' बंगल्याजवळ मध्यरात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर सकाळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही पुढाकार घेऊन या दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची स्वतंत्र फिर्याद दाखल केली.

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुचि' बंगल्याजवळ मध्यरात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर सकाळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही पुढाकार घेऊन या दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची स्वतंत्र फिर्याद दाखल केली. दरम्यान, शुक्रवारी (6 ऑक्टोबर) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हजार कार्यकर्त्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयात गेलेत. 

सध्या पोलीस अधीक्षक संदीप पाटील व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. जवळपास अर्धा तास ही चर्चा सुरू होती.  त्यामुळे पोलीस मुख्यालय परिसरात हजारो कार्यकर्ते जमा झाले होते. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री झालेला गोळीबार पोलिसांनी केला नाही, असे सांगितले गेल्यामुळे आता हा गोळीबार नेमका कोणत्या गटातील कार्यकर्त्याने केला, याचा शोध सुरू आहे. 

शाहूपुरीकडून येणारा रस्ताही पोलिसांनी बंद केला आहे. सुरुचि व जलमंदिर परिसरातही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.  पोलीस अधीक्षकांशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बंद खोलीत चर्चा सुरू असताना पोलीस मुख्यालय परिसरात हजारो कार्यकर्ते जमले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.