सातारा : शाहूपुरीत दोन जबरी चोरीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:03 IST2018-09-17T13:02:11+5:302018-09-17T13:03:11+5:30

शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवेकर हॉस्पिटलसमोर एका तरुणास चौघांनी लुटले. तर प्रतापसिंह शेती फार्म रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

Satara: In the Shahpura incident, two cases of theft | सातारा : शाहूपुरीत दोन जबरी चोरीच्या घटना

सातारा : शाहूपुरीत दोन जबरी चोरीच्या घटना

ठळक मुद्देहॉस्पिटलसमोर एका तरुणास चौघांनी लुटलेमहिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची घटना

सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवेकर हॉस्पिटलसमोर एका तरुणास चौघांनी लुटले. तर प्रतापसिंह शेती फार्म रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, संकेत रवींद्र लोखंडे (वय २१, रा. वनवासवाडी, एमआयडीसी) हा राधिका रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ उभा होता. त्यावेळी शुभम कांबळे, विजय कांबळे, रुईस आतार (तिघे रा. बुधवार नाका) व राहुल कदम (रा. करंजे) यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली.

ती संकेतने देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून चौघांनी त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शर्टच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम असा ४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला.

सुलभा गोपाळ जोशी (वय ५२, रा. शाहूपुरी) या रविवारी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी रस्त्यावारील दिवेकर हॉस्पिटलसमोरून चालत जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी जोशी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Satara: In the Shahpura incident, two cases of theft