शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

सातारा : करणीच्या बाहुल्यांपासून वनराईची मुक्तता, ‘अंनिस’ची मोहीम : मांढरदेव गडावरील बाहुल्या, चिठ्ठ्यांचे केले दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 5:52 PM

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा, वाई व पुणे येथील टीमने करणीच्या बाहुल्यांपासून मांढरदेवगडावरील वनराईची करणीच्या बाहुल्या, लिंबे, बिबे व चिठ्ठ्यांपासून मुक्तता केली. शनिवारी सकाळी धडाक्यात ही मोहीम राबविण्यात आली. हिरव्यागार वनराजीला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाऱ्या प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाऊल टाकले.

ठळक मुद्देमांढरदेवगडावरील वनराईची करणीच्या बाहुल्या, लिंबे, बिबे व चिठ्ठ्यांपासून मुक्तता वनराजीला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाऱ्या प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी पाऊल कांमध्ये दहशत पसरविण्याचा बेत ‘अंनिस’ने पाडला हाणून

सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा, वाई व पुणे येथील टीमने करणीच्या बाहुल्यांपासून मांढरदेवगडावरील वनराईची करणीच्या बाहुल्या, लिंबे, बिबे व चिठ्ठ्यांपासून मुक्तता केली. शनिवारी सकाळी धडाक्यात ही मोहीम राबविण्यात आली.हिरव्यागार वनराजीला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाऱ्या प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाऊल टाकले. मांढरगडावर झाडांना खिळे मारून ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकण्यात आले. मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा १, २ व ३ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.

इथे पशुबळी अथवा लिंबू , बिबे ठेवणे, झाडाला खिळे मारणे, वाद्य वाजविणे हा या कायद्याने गुन्हा आहे. तरी देखील मांढरदेवगडावर असे प्रकार होताना सर्रासपणे दिसतात. या माध्यमातून लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा बेत ‘अंनिस’ने हाणून पाडला.प्रशांत पोतदार, वीर पोतदार, भगवान रणदिवे, वंदना माने, हौसेराव धुमाळ (सातारा), डोंबलीकर, हरीश दिवार, प्रमोद भिसे, आशिष बनसोडे, संजय सकटे (वाई), नंदिनी जाधव, सुभाष सोळंकी, मोहिते, श्रीराम नलावडे, वल्लभ वैद्य (पुणे) यांनी शनिवारी झालेल्या बाहुल्या हटविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला.या सर्व सर्व बाहुल्या, चिठ्ठ्या, लिंब व बिबे गोळा करुन मोकळ्या जागेत त्यांचे दहन करण्यात आले. या माध्यमातून प्रबोधनाचा जागर करण्यात आला. करणी केली म्हणून कुणाचेही वाईट होत नाही, त्याउलट या प्रकारामुळे वनराईचे नुकसान होत आहे. ही बाब सगळ्यांनी समजून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी ‘अंनिस’ने स्पष्ट केले.मांढरदेवी मंदिराच्या मागील बाजूस बरीचशी झाडे आहेत. त्या झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या, लिंबू, चिठ्ठ्या लावून खिळे ठोकले जातात. अशा अघोरी प्रथा करून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. यामुळे जास्त प्रमाणात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ अंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याला दक्षता अधिकारी नेमण्यात आला आहे. असे अघोरी प्रकार होत असतील तर त्याला प्रतिबंध करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेता येऊ शकतो.सूचना फलक असूनही दुर्लक्षितदेवीच्या संपूर्ण मंदिर परिसरात पशुहत्त्या करण्यास बंदी आहे, झाडावर खिळे, बाहुली, बिबे आदी ठोकण्यास सक्त मनाई आहे, मंदिर व परिसरात अनिष्ठ रुढी परंपरा यास बंदी आहे, उतारे, करणीसारखे प्रकार करण्यास सक्त मनाई आहे, आपली कोणाकडून फसवणूक किंवा लुबाडणूक झाल्यास देवस्थानशी संपर्क साधून तक्रारी नोंदवावी, असा फलक देवस्थानतर्फे मांढरदेव गडावर लावण्यात आला आहे. पण याकडे दुर्लक्ष करून त्याशेजारीच असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकून बाहुल्या लटकवल्या जात आहेत. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर