सातारा : शहरात बेकायदा गुटखा विक्रीचे रॅकेट, कारवाईबाबत यंत्रणेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 15:15 IST2018-03-10T15:15:08+5:302018-03-10T15:15:08+5:30
सातारा शहरात बेकायदा गुटखा विक्रीचे रॅकेट कार्यरत आहे. पानटपऱ्यां, किराणा विक्री दुकानांमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री सुरु आहे. दुकानांच्या परिसरात गुटख्यांच्या पुड्यांचा खच पडतो. मात्र कारवाईबाबत यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सातारा : शहरात बेकायदा गुटखा विक्रीचे रॅकेट, कारवाईबाबत यंत्रणेचे दुर्लक्ष
सातारा : शहरात बेकायदा गुटखा विक्रीचे रॅकेट कार्यरत आहे. पानटपऱ्यां, किराणा विक्री दुकानांमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री सुरु आहे.
दुकानांच्या परिसरात गुटख्यांच्या पुड्यांचा खच पडतो. मात्र कारवाईबाबत यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातही गुटखा विक्री केली जात असल्याचे पुढे येत आहे. गुटख्याच्या बॅगा भरुन संबंधित पानटपऱ्या, दुकानांमध्ये वितरित केल्या जातात. यातून बक्कळ कमाई केली जात आहे.
गुटखा विक्रीवर बंदी असल्याने चढ्या भावाने गुटखा विकला जात आहे. शहराबाहेरच्या एखाद्या खेड्यात कारवाई दाखवून शहरातील राजरोसपणे सुरु असलेल्या या बेकायदा कृत्याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
सातारा शहरात पानटपरी, किराणा दुकानांमध्ये खुलेआमपणे गुटखा विक्री केली जात आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे व निमिष शहा यांनी दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शाळा, कॉलेजजवळ अशा प्रकारे गुटखा विक्री केली जात आहे. १५ दिवसांत ही कारवाई केली गेली नाही तर शिवसेना आपल्या कार्यालयाला टाळे ठोकेल, असा इशाराही देण्यात आला आहे.