सातारा : लूटमार करणाऱ्यांना पाठलाग करून पकडले, किरकोळ बाचाबाचीतून घडला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 14:05 IST2017-12-21T14:02:02+5:302017-12-21T14:05:14+5:30
किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून प्रवाशांची काही रोकड आणि दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघांना वाई आणि पाचगणी पोलिसांनी पाठलाग करून आनेवाडी टोलनाक्यावर पकडले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

सातारा : लूटमार करणाऱ्यांना पाठलाग करून पकडले, किरकोळ बाचाबाचीतून घडला प्रकार
सातारा : किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून प्रवाशांची काही रोकड आणि दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघांना वाई आणि पाचगणी पोलिसांनी पाठलाग करून आनेवाडी टोलनाक्यावर पकडले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
वाईहून पाचगणीकडे जाणाऱ्या दोन कारचालकांची किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर दुसऱ्या कारमधील दोघा प्रवाशांनी इतर प्रवाशांची रोकड आणि दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर संबंधित कार वाईहून साताऱ्याकडे निघाली. याची माहिती प्रवाशांनी पाचगणी पोलिसांना दिली.
त्यानंतर पाचगणी पोलिसांनी वाई पोलिसांच्या मदतीने संबंधितांचा पाठलाग सुरू केला. रात्री दहाच्या सुमारास आनेवाडी टोलनाक्यावर संंबंधितांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
नेमक्या कोणत्या कारणातून संबंधितांनी प्रवाशांना लुटले? हे अद्याप समोर आले नसून, तक्रारदाराने तक्रार न दिल्यामुळे अद्याप या घटनेचा गुन्हा पाचगणी किंवा वाई पोलिस ठाण्यात नोंद झाला नव्हता.