शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Satara: मान्सूनपूर्वने झोडपले; झाडे पडली, पत्रे उडाले; अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित

By नितीन काळेल | Published: May 29, 2023 10:44 PM

Satara: सातारा जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, सोमवारी तर अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने दणका दिला. त्याचबरोबर गारपीटही झाली तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडून वाहतूक विस्कळीत झाली.

- नितीन काळेल सातारा : जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, सोमवारी तर अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने दणका दिला. त्याचबरोबर गारपीटही झाली तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडून वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी घरावरील पत्रेही उडून गेले. तसेच अनेक गावातील वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. सातारा शहरात हलक्या सरी पडल्यामुळे गारवा निर्माण झाला.

जिल्ह्यात मे महिन्यात कडाक्याचे ऊन पडले. यामुळे मान्सूनचा पाऊस कधी सुरू होतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. असे असतानाच दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. थंडगार वारे वाहत असून, मान्सूनपूर्व पाऊसही हजेरी लावत आहे. सोमवारीही दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. याचवेळी जोरदार वारे वाहत असल्याने नुकसानही झाले.

सातारा शहरात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. काहीवेळ पावसाच्या सरी कोसळल्या. मोठ्या पावसाने साताऱ्याला हुलकावणी दिली असली तरी वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे सातारकरांची उकाड्यापासून काहीअंशी सुटका झाली आहे. तर वाई, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यालाही पावसाने झोडपले. महाबळेश्वरमध्ये चार वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत होता. याचवेळी मोठमोठ्या गारा पडत होत्या. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही भागात घरावरील पत्रेही उडून गेले. पाटण शहरासह परिसराला पावसाने झोडपले. यावेळी गारपीटही झाली. यामुळे पाटणच्या आठवडी बाजारात धांदल उडाली. तसेच पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले. आडदेव येथे घराचे छप्पर उडून गेले आहे तर वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.

शेतात पाणी शिरून भाज्यांचे नुकसान वाई शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागातही सोमवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरले. यामुळे पिकांसह पालेभाज्यांचे नुकसान झाले. तर अभेपुरी, वडाचीवाडी, गाढवेवाडी, मांढरेवाडी, वेलंग, असरे परिसरात जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडली. वाई-जांभळी रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला तर काही ठिकाणी घरावरील छप्पर उडल्याने नागरिकांचा निवारा गेला आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे पश्चिम भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर