ST Strike सातारा : पोलीस बंदोबस्तात एसटी धावल्या..,अचानक बंदमुळे प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 14:46 IST2018-06-08T14:43:58+5:302018-06-08T14:46:08+5:30
एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अचानक पुकारलेल्या संपामुळे साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकात बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी सकाळी प्रवाशांना याची कल्पना नसल्याने ते बसस्थानकातच अडकून पडले होते.

ST Strike सातारा : पोलीस बंदोबस्तात एसटी धावल्या..,अचानक बंदमुळे प्रवाशांचे हाल
सातारा : एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अचानक पुकारलेल्या संपामुळे साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकात बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी सकाळी प्रवाशांना याची कल्पना नसल्याने ते बसस्थानकातच अडकून पडले होते.
प्रवाशांच्या सोयीसाठी पोलिसांनी काही एसटी बसेसना बंदोबस्तात मार्गस्थ केल्याने अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र खासगी वाहतूकदारांकडून प्रवासासाठी वाटेल ते तिकिटाचे दर आकारले जात असल्याची तक्रार काही प्रवाशांमधून होत होती.
राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करीत वेतनवाढ मान्य नसल्याने सातारा जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी या बंदमध्ये भाग घेतला असल्याने जिल्ह्यात एसटीची चाके थांबली आहेत. जिल्ह्यातील डेपोमधल्या बाहेर गेलेल्या गाड्या सकाळी अकरापर्यंत माघारी येऊन त्याही संपात सहभागी झाल्या.