शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सातारा : कारवाई करून परतताना पोलीस अधिकाऱ्याचा धरला गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 8:12 PM

जुगार अड्ड्यावर छापा टाकून परतताना आरोपींनी पोलीस अधिकाºयाचा गळा धरल्याचा प्रकार सातारा तालुक्यातील बोरगाव येथील देशमुखनगर (लिंबाचीवाडी) येथे शनिवारी सायंकाळी घडला.

ठळक मुद्देपोलीस दलात खळबळ : जुगार अड्ड्यावर छापा

सातारा : जुगार अड्ड्यावर छापा टाकून परतताना आरोपींनी पोलीस अधिकाºयाचा गळा धरल्याचा प्रकार सातारा तालुक्यातील बोरगाव येथील देशमुखनगर (लिंबाचीवाडी) येथे शनिवारी सायंकाळी घडला.

सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी असे जखमी झालेल्या अधिकाºयाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोरगाव परिसरातील लिंबाचीवाडी येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस टीम तयार करून त्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेले.

जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी हे आपल्या कर्मचाºयांसमवेत पोलीस ठाण्यात परतत होते. यावेळी समीर मुलाणी याने शिवीगाळ व दमदाटी करत चौधरी यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. समीर मुलाणीने सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांचा गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर काही लोकांनी पोलिसांना शिवीगाळही केली. या घटनेनंतर पोलिसांची टीम बोरगाव पोलीस ठाण्यात आली. त्यानंतर संबंधित घडलेला प्रकार इतर अधिकाºयांच्या कानावर त्यांनी घातला.याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस