सातारा : कारवाई करून परतताना पोलीस अधिकाऱ्याचा धरला गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:12 IST2018-05-19T20:12:23+5:302018-05-19T20:12:23+5:30
जुगार अड्ड्यावर छापा टाकून परतताना आरोपींनी पोलीस अधिकाºयाचा गळा धरल्याचा प्रकार सातारा तालुक्यातील बोरगाव येथील देशमुखनगर (लिंबाचीवाडी) येथे शनिवारी सायंकाळी घडला.

सातारा : कारवाई करून परतताना पोलीस अधिकाऱ्याचा धरला गळा
सातारा : जुगार अड्ड्यावर छापा टाकून परतताना आरोपींनी पोलीस अधिकाºयाचा गळा धरल्याचा प्रकार सातारा तालुक्यातील बोरगाव येथील देशमुखनगर (लिंबाचीवाडी) येथे शनिवारी सायंकाळी घडला.
सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी असे जखमी झालेल्या अधिकाºयाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोरगाव परिसरातील लिंबाचीवाडी येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस टीम तयार करून त्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेले.
जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी हे आपल्या कर्मचाºयांसमवेत पोलीस ठाण्यात परतत होते. यावेळी समीर मुलाणी याने शिवीगाळ व दमदाटी करत चौधरी यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. समीर मुलाणीने सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांचा गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर काही लोकांनी पोलिसांना शिवीगाळही केली. या घटनेनंतर पोलिसांची टीम बोरगाव पोलीस ठाण्यात आली. त्यानंतर संबंधित घडलेला प्रकार इतर अधिकाºयांच्या कानावर त्यांनी घातला.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.