Satara-Poladpur Bus Accident : बस अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 19:24 IST2018-07-28T18:37:30+5:302018-07-28T19:24:39+5:30
महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे.

Satara-Poladpur Bus Accident : बस अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो
सातारा/पोलादपूर : महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत किमान सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सुदैवाने बसमधील एक प्रवासी बचावला. त्यांनीच अपघाताचा वृत्तांत सांगितलं आहे. प्रकाश सावंत-देसाई असं त्या प्रवाशाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील पोलीस अन् ट्रॅकर्सचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखले असून, आपत्कालीन विभागाच्या मदतीनं काही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघाताची भीषणता दाखवणारे फोटोही लोकमतच्या हाती लागले आहेत.