सातारा : पंचायत सर्व सभापती राष्ट्रवादीचेच !

By Admin | Updated: September 15, 2014 00:02 IST2014-09-14T23:27:56+5:302014-09-15T00:02:47+5:30

पंचायत समिती निवडी : काँग्रेस, शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी दोन उपसभापती

Satara: The Panchayat is all the Chairman of the Nationalist Congress Party! | सातारा : पंचायत सर्व सभापती राष्ट्रवादीचेच !

सातारा : पंचायत सर्व सभापती राष्ट्रवादीचेच !

सातारा : पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा बाजी मारली असून, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व अकरा पंचायत समितींच्या सभापतिपदी आणि सहा ठिकाणी उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे सदस्य विराजमान झाले आहेत. पाटण आणि खंडाळ्यात मात्र शिवसेनेचे उपसभापती झाले आहेत. काँग्रेसच्या वाट्याला कोरेगाव, माण उपसभापतिपद आले आहे. कऱ्हाडमध्ये उपसभापतिपदावर ‘काका काँग्रेस’ने बाजी मारली.सातारा जिल्ह्यात कऱ्हाड, फलटण, कोरेगाव, जावळी, माण, सातारा, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, खटाव आणि पाटण अशा अकरा पंचायत समिती आहेत. फलटण, वाई, महाबळेश्वर, खटाव आणि सातारा पंचायत समितीत ‘सबकुछ राष्ट्रवादी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माण, कऱ्हाड पंचायत समितीत यावेळी बदल घडेल, अशी परिस्थिती होती. मात्र, कऱ्हाडमध्ये ‘जैसे थे’ परिस्थिती राहिली आहे. माण पंचायत समिती निवडीवेळी काँग्रेसचे सदस्य शेखर गोरे यांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादीला सभापतिपदाची लॉटरी लागली. गोरेंच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादीला उपसभापतिपदावरही संधी होती. मात्र, येथे राष्ट्रवादीच्या सदस्यानेच काँग्रेसच्या पारड्यात मत टाकल्यामुळे उपसभापती काँग्रेसचा झाला. कोरेगावात चिठ्ठीनेच बदल घडविला. येथे सभापती राष्ट्रवादीचा तर उपसभापती काँग्रेसचा झाला. पाटणमध्येही चिठ्ठीद्वारेच निवडी झाल्या. साताऱ्यात अपेक्षेप्रमाणे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या कविता चव्हाण सभापती तर खासदार उदयनराजे समर्थक सूर्यकांत पडवळ उपसभापती झाले.
वाई आणि फलटण दोन्ही पदांवर ‘महिलाराज’ आहे. वाईमध्ये आ. मकरंद पाटील यांनी बाजी मारली तर फलटणमध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पुन्हा एकदा ‘किंगमेकर’ची भूमिका बजावली आहे.
खंडाळ्यात येथे राष्ट्रवादीचा सभापती तर शिवसेनेचा उपसभापती झाला आहे.

सकाळी प्रवेश... दुपारी उपसभापती
जावळी पंचायत समितीच्या निवडी धक्कादायक आहेत. राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचा पराभव करून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आणि नंतर ‘राष्ट्रवादीमय’ झालेल्या सुहास गिरी यांना सभापती केले आहे. काँग्रेसच्या एकमेव सदस्य असलेल्या निर्मला कासुर्डे यांनी सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करत उपसभापतिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली आहे.

Web Title: Satara: The Panchayat is all the Chairman of the Nationalist Congress Party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.