सातारा : पाचगणीत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई, तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:07 IST2018-11-30T17:06:03+5:302018-11-30T17:07:33+5:30

पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील तीन दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून साडेचार हजार रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला. तसेच तिघांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Satara: In Panchagani, Gutkha dealers took action, lodged a complaint against three | सातारा : पाचगणीत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई, तिघांवर गुन्हा दाखल

सातारा : पाचगणीत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई, तिघांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देपाचगणीत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई तिघांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील तीन दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून साडेचार हजार रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला. तसेच तिघांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

याबाबत माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न व सुरक्षा अधिकारी अनिल पवार यांच्या पथकाने पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील दुकान व पानटपऱ्यांवर छापा टाकला.

यावेळी महम्मद अस्लम इस्माईल (वय ३९) लच्चनसिंग करणसिंग रजपूत (२४), दगडू बबन जगदाळे (६५, तिघे रा. पाचगणी, ता. महाबळेश्वर) यांच्या दुकानांतून विमल पान मसाला, व्ही. सेंटेंड टोबॅको, हिरा पान मसाला, रॉयल ७१७ तंबाखू, आरएमडी गुटखा, गोवा १००० इत्यादी ४ हजार ५०० रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला.

तिघांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भूतकर करीत आहेत.

Web Title: Satara: In Panchagani, Gutkha dealers took action, lodged a complaint against three