सातारा : हॉटेलमध्ये घुसलेल्या भरधाव कारखाली चिरडून एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 17:38 IST2018-03-27T17:38:59+5:302018-03-27T17:38:59+5:30
पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कार हॉटेलमध्ये घुसली. यात एक ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना वाढे फाटा परिसरात मंगळवारी पहाटे घडली. गोपाळ शिवाजी गायकवाड (वय १९ रा. सोनखेड, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृताचे नाव आहे.

सातारा : हॉटेलमध्ये घुसलेल्या भरधाव कारखाली चिरडून एक ठार, दोन जखमी
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कार हॉटेलमध्ये घुसली. यात एक ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना वाढे फाटा परिसरात मंगळवारी पहाटे घडली. गोपाळ शिवाजी गायकवाड (वय १९ रा. सोनखेड, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावरून रंगराव दत्तात्रय वाठारकर (रा. म्हाडा कॉलनी, कोल्हापूर) हे कार (एमएच ०९ बीएक्स ६९४६) भरधाव वेगात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मानस हॉटेलच्या पार्किंगमधून पान टपरीत घुसली.
दरम्यान, टपरीमध्ये झोपलेले गोपाळ शिवाजी गायकवाड या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर मिथून चक्रवर्ती, अरविंद जगनाथ जाधव (रा. वाढे, ता. सातारा) जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा गुन्हा दाखल करून कार व चालकास ताब्यात घेतले.