सातारा : तिसऱ्या मजल्यावरून पडून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:40 IST2018-04-03T16:40:54+5:302018-04-03T16:40:54+5:30

केसरकर पेठेतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. नारायण मुन्सी वर्मा (वय २६ रा. पंपरिदा, ता. फत्तेपूर, जि. कानपूर, उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव आहे.

Satara: One killed after falling from the third floor | सातारा : तिसऱ्या मजल्यावरून पडून एक ठार

सातारा : तिसऱ्या मजल्यावरून पडून एक ठार

ठळक मुद्देतिसऱ्या मजल्यावरून पडून एक ठाररुग्णालयात दाखल क पूर्वीच मृत्यू

सातारा : केसरकर पेठेतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. नारायण मुन्सी वर्मा (वय २६ रा. पंपरिदा, ता. फत्तेपूर, जि. कानपूर, उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, केसरकर पेठेतील ड्रीम होम या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काम करणारा नारायण वर्मा या इमारतीमध्येच झोपत होता.

नेहमीप्रमाणे तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर झोपला असता अचानक पहाटे दीड वाजता खाली पडला. त्याचे दोन पाय व उजवा हात मोडून बेशुद्ध अवस्थेत पडला. त्याला खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Satara: One killed after falling from the third floor