शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : सेवागिरी महाराजांच्या रथावर ५८ लाख ४३ हजारांची देणगी अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 15:39 IST

महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांतून पुसेगाव यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी एका दिवसात श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर ५८ लाख ४३ हजार ८५२ रुपयांची देणगी मनोभावे अर्पण केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रथावरील देणगीत ७ लाख ६४ हजार ६०१ रुपयांची वाढ झाली आहे. या देणगीमध्ये अमेरीका, इंग्लंड, भुतान, नेपाळ, झिम्बाँबे, सिंगापूर, कुवेत येथील परकीय चलनांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देदेणगी मनोभावे अर्पण, परकीय चलनांचाही समावेश यंदा ७ लाख ६४ हजार ६०१ रुपयांची वाढपोलिस बंदोबस्तात पहाटे चार वाजता रक्कम मोजण्याचे काम पूर्ण

सातारा : महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांतून पुसेगाव यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी एका दिवसात श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर ५८ लाख ४३ हजार ८५२ रुपयांची देणगी मनोभावे अर्पण केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रथावरील देणगीत ७ लाख ६४ हजार ६०१ रुपयांची वाढ झाली आहे. या देणगीमध्ये अमेरीका, इंग्लंड, भुतान, नेपाळ, झिम्बाँबे, सिंगापूर, कुवेत येथील परकीय चलनांचाही समावेश आहे.श्री सेवागिरी महाराजांच्या ७० व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार, दि. १७ डिसेंबर रोजी पुसेगाव येथे रथ सोहळा उत्साहात पार पडला. सुमारे सात लाख भाविकांनी हा सोहळ्याला हजेरी लावली. रथोत्सव सुटीच्या दिवशी आल्याने पहाटेपासूनच भाविकांची संख्या वाढत होती.

रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी नोंटाच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. सकाळी अकरा वाजल्यापासून गर्दीत वाढ होत गेली अन् महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकोळून गेला. यंदा दरवर्षीपेक्षा भाविकांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले.

 

देणगीमध्ये अमेरीका, इंग्लंड, भुतान, नेपाळ, झिम्बाँबे, सिंगापूर, कुवेत येथील परकीय चलनांचाही समावेश आहे. 

भाविकांनी आपापल्या परिने १०, २०, ५०, १०० तसेच नव्या ५०० व २००० रुपयांच्या नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्या. नोटाबंदीच्या काळानंतर रथावर किती देणगी जमा होणार, याबाबत उत्सुकता लागली होती. मात्र, या वर्षी देणगी रकमेत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७ लाख ६४ हजार ६०१ रुपयांची लक्षणीय वाढ झाली. भाविकांनी एकूण ५८ लाख ४३ हजार ८५२ रुपयांची देणगी रथावर मनोभावे अर्पण केली.

सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस रविवारी सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला आणि रात्री दहा वाजता रथोत्सवाची सांगता झाल्यानंतर रथ मंदिरात पोहोचला. या ठिकाणी रथावरून नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले.

पोलिस बंदोबस्तात ही सर्व रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेश जाधव यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली. रात्री अकरा वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDatta Mandirदत्त मंदिर