लाखो यात्रेकरूंसाठी नळाद्वारे पुसेगाव येथे शुद्ध पाणी : ग्रामपंचायत सज्ज -पुसेगाव यात्रा 2017

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:30 PM2017-12-15T22:30:24+5:302017-12-15T22:33:30+5:30

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज वार्षिक रथोत्सवानिमित्त पुसेगाव येथे शनिवारपासून सुरू होत असलेल्या यात्रेसाठी येणाºया भाविक, दुकानदारांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज आहे.

 Pure water in Pusgaon by NAL for millions of pilgrims: Gram panchayat Sajj-Pasegaon Yatra 2017 | लाखो यात्रेकरूंसाठी नळाद्वारे पुसेगाव येथे शुद्ध पाणी : ग्रामपंचायत सज्ज -पुसेगाव यात्रा 2017

लाखो यात्रेकरूंसाठी नळाद्वारे पुसेगाव येथे शुद्ध पाणी : ग्रामपंचायत सज्ज -पुसेगाव यात्रा 2017

googlenewsNext
ठळक मुद्देसरपंच, उपसरपंचांनी घेतला तयारीचा आढावा; जादा कर्मचाºयांची नेमणूक- पुसेगावात आज रंगणार कुस्त्यांचा जंगी आखाडा

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज वार्षिक रथोत्सवानिमित्त पुसेगाव येथे शनिवारपासून सुरू होत असलेल्या यात्रेसाठी येणाºया भाविक, दुकानदारांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज आहे. यात्रेकरूंना जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शुद्ध व मुबलक पाणी देण्यात येणार आहे,’ अशी माहिती सरपंच दीपाली मुळे व उपसरपंच रणधीर जाधव यांनी दिली.

यात्रा काळात भाविक, दुकानदार, बैलबाजार, कृषीप्रदर्शन व ग्रामस्थांना जलशुद्धीकरणाद्वारे मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. यासाठी नेर तलावातील दोन, काटकरवाडी येथील एक व जुनी वॉटर सप्लायची एक विहिरीद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. बैलबाजार वगळता इतरत्र नळाद्वारे पाणी पुरवठा होणार आहे.
बैल बाजारात काही ठिकाणी स्थानिक शेतकºयांच्या सहकार्याने जलवाहिनीद्वारे पाणी देण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित भागात पाणी देण्यासाठी टँकरचे नियोजन केले आहे.

आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार गावातील हातपंप शुद्धीकरण केले आहेत. नळपाणी पुरवठा व व्हॉल्व गळती काढली आहे. वीज वितरणने चोवीस तास वीज देण्याचे मान्य केले आहे. यामुळे यात्रेकरूंना वेळेत पाणी देणे शक्य होणार आहे. अडचणीच्या काळात जादा वीजपंपाची सोय करणार आहे. पाणी पुरवठ्यासाठी जादा कर्मचारी नेमले आहेत,’ अशी माहिती सरपंच मुळे, उपसरपंच जाधव, ग्रामविकास अधिकारी एन. एम. नाळे यांनी दिली.

नियंत्रण कक्ष
यात्रा काळात गटारांवर दोनदा औषध फवारणी करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच धुराची फवारणी केली आहे. ठिकठिकाणी नवीन एलईडी बल्ब तसेच सौरदिवे लावले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये महसूल विभागातर्फे प्रशासकीय यंत्रणेसाठी नियंत्रण कक्ष स्थापना केला आहे. तेथून यात्रेचे नियोजन केले जाणार आहे. ग्रामपंचायत, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पोलिस यंत्रणा तसेच आरोग्य विभागातर्फे यात्रा काळातील योग्य ते नियोजन केले आहे

व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या अरुण शर्मा संघ विजेता
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव येथे आयोजित अखिल भारतीय दिवसरात्र शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघावर मात करत उत्तर प्रदेशच्या अरुण शर्मा संघाने नेत्रदीपक खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला.

येथील श्री हनुमानगिरी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाले.

अंतिम सामना उत्तर प्रदेशच्या अरुण शर्मा संघ व सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघ (अस्लम) यांच्यात झाला. यात उत्तर प्रदेश संघाने विजय मिळवत श्री सेवागिरी चषकासह प्रथम क्रमांकाचे बक्षिस श्री सेवागिरी स्मृतिचिन्ह व २५ हजारांचे बक्षिस पटकाविले. द्वितीय क्रमांक सोलापूरच्या अस्लम व्हॉलीबॉल संघाने १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक मालेगाव येथील इस्तियाक व्हॉलीबॉल संघाने दहा हजार रुपये, चतुर्थ क्रमांक मालेगाव येथील व्हॉलीबॉल संघ पाच रुपये, पाच ते आठ क्रमांकासाठी दोन हजारांचे बक्षिस अनुक्रमे आयसीसी मालेगाव, सहावा क्रमांक पंजाब खली, हरियाना सुरेश व्हॉलीबॉल संघ, सोलापूरचा जयंत व्हॉलीबॉल संघाने मिळवले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. स्पर्धेत वीस संघांनी सहभाग घेतला.

पंच नंदकुमार भोईटे, आबा गायकवाड, जावेद मनोरे, विजय कोकीळ, जयप्रकाश दिल्ली फेडरेशन यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरत जाधव, जे. टी. जाधव, विजयसिंह जाधव, दीपक जाधव, मंगेश जाधव, अशोक जाधव, सुनील जाधव, विजय द. जाधव, संजय जाधव, शंकर शेडगे, निखील जाधव, रवी देशमुख, उत्तम सावंत, मयूर हिंगमिरे, मयूर विधाते, सचिन जाधव, राजू तारळकर यांच्यासह प्रशासनाने परिश्रम घेतले.
पुसेगावात आज रंगणार कुस्त्यांचा जंगी आखाडा
पुसेगाव : ‘श्री सेवागिरी महाराजांचे पुण्यस्मरण व नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे शनिवार, दि. १६ रोजी दुपारी दोनला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे,’ अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.

शासकीय विद्यानिकेतनच्या शेजारील आखाड्यात आंतरराष्टÑीय कुस्ती केंद्र आंबेगाव पुणे येथील काका पवारांचा पठ्ठा कौतुक ढाफळे व कर्नाटक केसरी दावणगिरीचा कौतुक काटे, पुणे येथील आं. रा. कुस्ती केंद्राचा गणेश जगताप व कोल्हापूरच्या शाहूपुरी तालीम संतोष दोरवड, न्यू मोतिबाग तालीम कोल्हापूरचा बालारफिक शेख व ज्ञानेश्वर गोचडे, गंगावेश तालीम कोल्हापूरचा योगेश बोंबाळे व पुणे येथील आं. रा. कुस्ती केंद्राचा अतुल पाटील, पुणे येथील आंतरराष्टÑीय कुस्ती केंद्राचा पोपट घोडके विरुद्ध कोल्हापूरच्या मोतिबाग तालिमचा अमोल फडतरे, गोकुळ आवारे विरुद्ध विजय धुमाळ, संदीप काळे विरुद्ध नाथा पालवे यासह अनेक नामांकित पैलवानांच्यातील रोमहर्षक लढती पाहायला मिळणार आहेत.

पंच म्हणून मेजर कृष्णात जाधव, सुभाष माने, मोहन जाधव, दिल्लीतील सेनादलाती कुस्ती प्रशिक्षक हणमंतराव गायकवाड, विकास जाधव, श्रीमंत जाधव, अण्णा साप, नितीन राजगे, राजेंद्र कणसे, मधुकर शिंदे, अधिक जाधव, तानाजी मांडवे हे काम पाहणार आहेत.शंभर रुपयांपासून पाच हजार रुपये बक्षिसापर्यंतच्या पैलवानांनी जोड्या सकाळी ९ ते १२ यावेळेत कुस्ती आखाड्यात नोंद कराव्यात.

मठाधिपती सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, उपसरपंच रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेश जाधव यांच्या उपस्थितीत दुपारी एकला कुस्त्याचा इनाम सेवागिरी मंदिरातून वाजत गाजत आखाड्यात नेण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title:  Pure water in Pusgaon by NAL for millions of pilgrims: Gram panchayat Sajj-Pasegaon Yatra 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.