शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :हमरस्ता नव्हे ... ही तर शेतातली पायवाट, रांजणी पाटी-पळशी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:56 IST

माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून रस्ता खराब झाला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय तर चालणेही अवघड झाले आहे.

ठळक मुद्दे२८ वर्षांचा वनवास संपविण्याची ग्रामस्थांची मागणीरांजणी पाटी-पळशी रस्त्याची दुरवस्था रात्रीच्या वेळी घडतात अपघात, विद्यार्थी संख्या घटली

पळशी : माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून रस्ता खराब झाला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय तर चालणेही अवघड झाले आहे. गेल्या २८ वर्षांपासून रस्त्याची अवस्था जैसे थे असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.वाहनचालकांनी काही ठिकाणी रस्त्यालगतच्या मोकळ्या शेतातूनच रहदारी सुरू केली आहे. परिणामी शेतकरी व वाहनचालक यांच्यामध्ये नेहमीच शाब्दिक चकमकी उडताना दिसत आहेत. जवळपास गेल्या २८ वर्षांपासून रस्त्याची अवस्था जैसे थे असून, आता तरी हा वनवास संपणार का? असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे.

पळशी-रांजणीपाटी हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या रस्त्यावर कधीच डांबर पडले नाही. जवळपास १९७७ च्या सुमारास हा रस्ता तयार करण्यात आला होता.त्यानंतर या रस्त्यावर ना कधी डांबर पडले, ना रस्त्याची कधी दुरुस्ती करण्यात आली, असे ग्रामस्थ सांगत आहेत.

या परिसरासह रांजणी, भालवडी, पुजारमळा, बागेचा मळा येथून दर पोर्णिमेला गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर जात असतात. गोंदवले येथे जाण्यासाठी हाच नजीकचा मार्ग असून, रस्त्याची दुर्दशा झाल्याने भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पळशी येथे शिक्षणासाठीही विद्यार्थी याच रस्त्याने जातात. विद्यार्थ्यांनाही रोज याच रस्त्याच्या जाचातून जावे लागत आहे. तरी संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.रात्रीच्या वेळी घडतात अपघातरांजणीपाटी-पळशी रस्त्यावरील खड्ड्यात पावसाळ्यामध्ये पाणी साठून राहिल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या मार्गावर नेहमीच लहान-मोठे अपघात घडत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

विद्यार्थी संख्या घटलीपळशी येथे पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे आणि या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. पूर्वी या परिसरातून विद्यार्थ्यांचा लोंढाच्या लोंढा पळशी शाळेत जात होता. याच शाळांमधून शिक्षण घेऊन पळशीत शेकडो अधिकारी तयार झाले; पण रस्त्याच्या दुर्दशेमुळे माळीखोरा येथील विद्यार्थी दुसऱ्या गावात मार्डी येथे शिक्षणासाठी जात आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा