शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: शिरवळला नीरा नदीपात्रात आढळला मानवी सांगाडा, परिसरात उडाली एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:52 IST

शिरवळ पोलिसांकडून तपास सुरू

शिरवळ : येथील गोलघुमटाजवळील नीरा नदीपात्रात सडलेल्या अवस्थेमध्ये मानवी पुरुष जातीचा सांगाडा आढळून असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित सांगाडा ३० ते ३५ वयोगटातील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.घटनास्थळ व शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ हद्दीमध्ये मांड ओढ्याच्या पुढे नीरा नदीपात्रामध्ये नीरा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाणी उपसा करणारी मोटर पाण्यामध्ये टाकण्याकरिता एक शेतकरी नीरा नदीपात्रात उतरला होता. यावेळी मोटरची पाहणी करत असताना संबंधित शेतकऱ्याला नीरा नदीपात्रातील डोहात एक मानवी सांगाडा सडलेल्या अवस्थेमध्ये निदर्शनास आला.

त्यानुसार संबंधित शेतकऱ्याने तातडीने शिरवळ पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानंतर शिरवळचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलिस अंमलदार संजय सकपाळ, छगन शेडगे, शिवराज जाधव यांनी शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांसह घटनास्थळी धाव घेतली.त्याठिकाणी संपूर्ण सडलेल्या अवस्थेमध्ये मानवी सांगाडा असल्याचे व त्याच्या हातामध्ये दोरा असल्याचे आढळून आले. यावेळी शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती पवार यांनी घटनास्थळीच संबंधित सांगाड्याची उत्तरतपासणी केली. संबंधित मृतदेह कोणाचा आहे, याबाबतचा तपास शिरवळ पोलिसांकडून सुरू आहे. शिरवळ पोलिस ठाण्यात याची नोंद झाली असून, पोलिस अंमलदार छगन शेडगे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस