सातारा : पोलीस चौकीपासून जवळच चोरट्यांचा दागिन्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:38 IST2018-11-12T13:27:08+5:302018-11-12T13:38:42+5:30

करहर पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महू गावात रविवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारुन विठ्ठल मारुती गोळे यांच्या घरातील कपाट व पेटीत ठेवलेले सोन्याचे जवळपास दहा ते बारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Satara: Near the police chowki, near the thieves of the thieves | सातारा : पोलीस चौकीपासून जवळच चोरट्यांचा दागिन्यावर डल्ला

सातारा : पोलीस चौकीपासून जवळच चोरट्यांचा दागिन्यावर डल्ला

ठळक मुद्देपोलीस चौकीपासून जवळच चोरट्यांचा दागिन्यावर डल्लाश्वानपथकाच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न

सायगाव : करहर पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महू गावात रविवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारुन विठ्ठल मारुती गोळे यांच्या घरातील कपाट व पेटीत ठेवलेले सोन्याचे जवळपास दहा ते बारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, महू, ता. जावळी येथील विठ्ठल मारुती गोळे हे रविवारी रात्री कुटुंबीयांसह घराच्या पडवीमध्ये झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी पाठीमागून घराच्यामागचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील ऐवज लंपास करुन पलायन केले.

दरम्यान मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने हे कर्मचाऱ्यांबरोबर घटनास्थळी दाखल झाले होते. श्वानपथकाच्या सहाय्याने पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Satara: Near the police chowki, near the thieves of the thieves