दुर्दैव! लग्नाच्या काही तासांपूर्वीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 15:56 IST2018-02-21T13:58:28+5:302018-02-21T15:56:13+5:30
लग्नाला काही तास उरले असतानाच कोरेगाव येथील एका नियोजित वराचा ट्रॅक्टर ट्रॉलीने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश विश्वासराव बर्गे (वय २४, रा. कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या वराचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दुर्दैव! लग्नाच्या काही तासांपूर्वीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू
कोरेगाव : लग्नाला काही तास उरले असतानाच कोरेगाव येथील एका नियोजित वराचा ट्रॅक्टर ट्रॉलीने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश विश्वासराव बर्गे (वय २४, रा. कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या वराचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव येथील गणेश बर्गे यांचा बुुधवार, दि. २१ रोजी सायंकाळी कोरेगाव येथे विवाह होणार होता. दोन्ही पक्षांकडील मंडळींची विवाहाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. दरम्यान, गणेश बर्गे हे बुधवारी सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते.
कोरेगाव मार्केट यार्ड नजीक असलेल्या सातारा-पंढरपूर रस्त्याकडे ते गेले होते. या ठिकाणी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतानाच अचानक समोरून आलेल्या उसाच्या ट्रॉलीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने गणेश बर्गे यांचा जागीच मृत्यू झाला. लग्नाला काही तास उरले असताना बर्गे यांच्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.