शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

सातारा : पाणी फाउंडेशनच्या भोसरे केंद्राला चंद्रकांत दळवी यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:27 PM

खटाव तालुक्यातील भोसरे येथील पाणी फाउंडेशनच्या सराव केंद्राला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेऊन भोसरेची शिवारफेरी केली.

ठळक मुद्देपाणी फाउंडेशनच्या भोसरे केंद्राला चंद्रकांत दळवी यांची भेटजलसाठा समाधान : जलक्रांतीमुळे दुष्काळाची पुनरावृत्ती रोखणे शक्य

औंध : खटाव तालुक्यातील भोसरे येथील पाणी फाउंडेशनच्या सराव केंद्राला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेऊन भोसरेची शिवारफेरी केली.यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विश्वास गुजर, सभापती संदीप मांडवे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार, अनिल पवार, सरपंच महादेव जाधव, चेअरमन संतोष जाधव, नितिन जाधव-पाटील , जितेंद्र शिंदे, भाऊ जाधव, विष्णू जाधव, भीमराव जाधव, ग्रामसेवक दादासाहेब गावडे, विलास काळे उपस्थित होते.दळवी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावात झालेल्या जलक्रांतीमुळे दुष्काळाची पुनरावृत्ती रोखण्यासाठी मोठी मदत झाली. भोसरेत झालेली जलक्रांती ही ग्रामस्थांच्या एकीचे फलित आहे.  प्रत्येकाने स्वत:पासून सुरूवात केली की आपोआप लोकसहभागाची कामे होतात. भोसरे गावाची चर्चा जशी महाराष्ट्रात आहे, तशी गावाची चर्चा सुद्धा झाली पाहिजे. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले पाहिजे यासाठी सर्वांनी मिळून मिसळून राहावे. तहसीलदार विश्वास गुजर, सभापती संदीप मांडवे यांनीही मनोगत व्यक्त केले.वॉटर सरप्लसकडे वाटचाल कराभोसरेत मार्च महिन्यात भरलेले बंधारे पाहून विभागीय आयुक्त दळवी अत्यंत आनंदित झाले. आता वॉटर बजेट तर आहेच पण वॉटर सरप्लसकडे वाटचाल करा, असा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा