शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : उदयनराजे-अजित पवारांमधील मौन सुटले, दूरध्वनीवरून संभाषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 18:17 IST

खासदार उदयनराजे भोसले आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मौन अखेर सुटले. खासदार उदयनराजेंनी २४ फेब्रुवारी रोजी आयोजित सोहळ्यासाठी अजित पवार यांना निमंत्रित केले. दोघांनी दूरध्वनीवरूनही एकमेकांशी संभाषण साधल्याची जोरदार चर्चा असून, मौन सुटले तर वैर सुटणार का? याची उत्सुकता समस्त सातारवासीयांना लागून राहिली आहे.

ठळक मुद्देसोहळ्यासाठी अजित पवार निमंत्रित २४ फेब्रुवारी रोजीच्या सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मौन अखेर सुटले. खासदार उदयनराजेंनी २४ फेब्रुवारी रोजी आयोजित सोहळ्यासाठी अजित पवार यांना निमंत्रित केले. दोघांनी दूरध्वनीवरूनही एकमेकांशी संभाषण साधल्याची जोरदार चर्चा असून, मौन सुटले तर वैर सुटणार का? याची उत्सुकता समस्त सातारवासीयांना लागून राहिली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी वेगळीच रणनिती आखला आहे. सर्वपक्षीयांना त्यांनी वाढदिवसाचे आवतण धाडले आहे. अनेकांशी ते जातीने फोनवरून संभाषण साधत आहेत. अजित पवार यांच्याशी त्यांनी संभाषण साधल्याने एक वेगळेच वातावरण तयार झाले.राजधानी साताऱ्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेतेमंडळींना आवतण धाडले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया उदयनराजेंनी साधली आहे.सातारकरांच्या जिव्हाळ्याची आणि बरेच वर्षे रखडलेल्या कामांना मुहूर्ताने मार्गी लावण्याचे उदयनराजेंनी ठरविले आहे. कास तलावाची उंची वाढविणे, भुयारी गटार योजनेचा प्रारंभ, पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटर, सातारा पालिकेची नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आदी कार्यक्रम होणार आहेत.

२४ फेब्रुवारी रोजी खासदार उदयनराजे भोसले यांचा ५१ वा वाढदिवस आहे. निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा वाढदिवस थाटात साजरा करण्यासाठी उदयनराजेंच्या मावळ्यांनी उचल खाल्ली आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAjit Pawarअजित पवारSatara areaसातारा परिसर