संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही - उदयनराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 01:23 PM2018-01-05T13:23:55+5:302018-01-05T13:25:23+5:30

'भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही', असं उदयनराजे भोसलेंनी ठणकावून सांगितलं आहे.

No one wants to talk about Sambhaji Bhat - Udayan Raje Bhosale | संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही - उदयनराजे भोसले

संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही - उदयनराजे भोसले

googlenewsNext

नवी दिल्ली -  कोरेगाव भीमा घटनेवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना पाठिंबा दिला आहे. 'भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही', असं उदयनराजे भोसलेंनी ठणकावून सांगितलं आहे. 'संभाजी भिडे यांच्याबाबत मनात आदर आहे, ते मॅथेमॅटिक्स विषयाचे प्रॉफेसर होते. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर माझे गुरुजींसोबत बोलणे झाले, त्यावेळी बोलताना गुरुजी रडले', असे उदयनराजे यांनी सांगितले. 

जातीच्या आधारावर देशाचे तुकडे होण्याआधी माझे डोळे मिटलेले बरे. देशाचे तुकडे झालेले मला सहन होणार नाही, अशी भावना उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केल्या. शिवाय समाजात तेढ निर्माण करणा-यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीदेखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे. हिंसाचारामुळे दोन हजार कोटींचं नुकसान, उद्रेक करणारी वक्तव्यं करु नयेत, असं आवाहनदेखील यावेळी उदयनराजेंनी केले.  

आरोप निराधार - संभाजी भिडे

कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार घडवल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून कोरेगाव-भीमामधील हिंसाचारातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. कोरेगाव भीमा दंगलीत मी उपस्थित होतो व कारणीभूत आहे, असं विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांचे आरोप निराधार असून शासनाने या घटनेची म्हणजेच बनावाची पाळेमुळे शोधून चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी गुरुवारी (4 जानेवारी) पत्रकाद्वारे केली आहे. 

संभाजी भिडे यांनी पत्रकात म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या बीजमंत्राच्या आधारावर राष्ट्रजागृती करण्याचे काम आम्ही करतो. "कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत मी होतो व मी कारणीभूत आहे', असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेप्रमाणे गावोगावी त्यांच्या अनुयायांनी तोडफोड करून वाहने, घरे, दुकाने आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस केला आहे. या सर्व गोष्टींना कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींमध्ये माझे नाव कारणीभूत असल्याचे आंबेडकर बोलले आहेत. त्यांनी निराधार आरोप करून माझ्यावर अटकेची कारवाई करून गुन्हा नोंद करून, मला याकूब मेमनची वाट दाखवावी, अशी मागणी केली आहे. 

माझी शासनाला विनंती आहे की, या घटनेची म्हणजेच बनावाची खोलात जाऊन पाळेमुळे शोधून चौकशी करावी. जे अपराधी असतील त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे, असं पत्रकात म्हटलं आहे. 
 

Web Title: No one wants to talk about Sambhaji Bhat - Udayan Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.