सातारा: मकरसंक्रांतीला नववधूबरोबर 'लोकमत दिपोत्सवची बुत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:38 PM2019-01-15T13:38:49+5:302019-01-15T13:40:51+5:30

मकरसंक्रांती निमित्ताने माहेरी जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील नववधूसोबत पारंपारिक बुत्तीबरोबर 'लोकमत'च्या दिपोत्सव अंकाची टोपली बुत्ती म्हणून देण्यात आली. हे अंक बुत्ती म्हणून महिलांना वाटण्यात आले.

Satara: 'Lokmat Dipotsav's Batta' with the bridegroom in Makar Sankranti | सातारा: मकरसंक्रांतीला नववधूबरोबर 'लोकमत दिपोत्सवची बुत्ती

सातारा: मकरसंक्रांतीला नववधूबरोबर 'लोकमत दिपोत्सवची बुत्ती

googlenewsNext
ठळक मुद्देमकरसंक्रांतीला नववधूबरोबर 'लोकमत दिपोत्सवची बुत्तीपिंपरीत आगळा वेगळा उपक्रम : ज्ञान प्रसारासाठी उचलले पाऊल

रहिमतपूर (सातारा) : मकरसंक्रांती निमित्ताने माहेरी जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील नववधूसोबत पारंपारिक बुत्तीबरोबर 'लोकमत'च्या दिपोत्सव अंकाची टोपली बुत्ती म्हणून देण्यात आली. हे अंक बुत्ती म्हणून महिलांना वाटण्यात आले.

पिंपरी येथील क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास समितीचे संस्थापक शंकर कणसे यांचे सुपुत्र किरण व अंकिता यांचा सत्यशोधक विवाह सोहळा यापूर्वी पार पडला आहे. या विवाह सोहळ्यात कणसे कुटूंबियांकडून येणाऱ्या पाहुण्यांना १३०० पुस्तके भेट देण्यात आले. तसेच कणसे परिवाराने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी सुमारे १,१०० पुस्तके भेट स्वरूपात दिली होती. या पुस्तकांचे पिंपरी येथे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.

विवाहात वधूची ओटीदेखील पुस्तकांनीच भरण्यात आली होती. त्याच पद्धतीने मकरसंक्रांतीला नववधूला पारंपरिक बुत्तीबरोबरच ज्ञानाच्या प्रसारासाठी वेगळं काहीतरी करण्याचा विचार शंकर कणसे यांच्या मनात गेले काही दिवस घोळत होता.

कणसे यांच्या वाचनात लोकमत दीपोत्सव हा अंक आला होता. यामध्ये वाचनीय लेख असल्याने हे अंक महिलांच्या वाचनात आल्यास निश्चितपणे त्याच्या ज्ञानात भर पडेल. त्यामुळे त्यांनी सुन अंकिता मकरसंक्रांती निमित्ताने माहेरी जाताना तिच्यासोबत पारंपरिक बुत्तीबरोबर 'लोकमत'चा उत्कृष्ट लेख असलेल्या दीपोत्सवचे अंक बुत्ती म्हणून देवून महिलांना वाटण्यात आले. या उपक्रमाचे महिलांच्याकडून स्वागत करण्यात आले.

Web Title: Satara: 'Lokmat Dipotsav's Batta' with the bridegroom in Makar Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.