सातारा : लग्न केले नाहीस तर जीव देईन, युवतीला युवकाची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:27 IST2018-12-27T13:26:54+5:302018-12-27T13:27:57+5:30
लग्न न केल्यास जीवे देईन,अशी धमकी एका महाविद्यालयीन युवकाने युवतीला दिल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता संगमनगर येथे घडली.

सातारा : लग्न केले नाहीस तर जीव देईन, युवतीला युवकाची धमकी
ठळक मुद्देलग्न केले नाहीस तर जीव देईनयुवतीला युवकाची धमकी
सातारा : लग्न न केल्यास जीवे देईन,अशी धमकी एका महाविद्यालयीन युवकाने युवतीला दिल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता संगमनगर येथे घडली.
यश गोरख उदागे (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. संबंधित पीडित युवती कॉलेजला जात असताना उदागे याने तिचा पाठलाग केला.
'तू लग्न केले नाहीस तर जीव देईन, अशी त्याने धमकी दिली. तसेच शिवीगाळही केली. या प्रकारानंतर पीडित युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही.