सातारा : रेल्वे प्रवाशांना लुटणारी टोळी अहमदनगर येथे सापळा रचून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 13:57 IST2018-10-01T13:55:42+5:302018-10-01T13:57:43+5:30
पुणे-मिरज रेल्वे मार्गावर आदर्की रेल्वे स्टेशननजीक सिग्नलची तोडफोड करून रेल्वेतील प्रवाशांना लुटण्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी

सातारा : रेल्वे प्रवाशांना लुटणारी टोळी अहमदनगर येथे सापळा रचून जेरबंद
सातारा : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर आदर्की रेल्वे स्टेशननजीक सिग्नलची तोडफोड करून रेल्वेतील प्रवाशांना लुटण्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी जामखेड, जि. अहमदनगर येथे सापळा रचून तिघांना अटक केली.
यात रोहित गोरख रलेभात (वय २४) विनोद सखाराम जाधव (३०) बाबू मोहन कसबे (२५ सर्व राहणार जामखेड, जि. अहमदनगर) यांना अटक केली.याबाबत रेल्वे सुरक्षा बल सातारा यांनी दिलेली माहिती अशी की, सातारा, जळगाव, सोलापूर, हैद्र्राबाद, गुंतकल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रेल्वेचे सिग्नल तोडून गाडी थांबल्यानंतर प्रवाशांचे पैसे, सोने, मोबाईल व अन्य मौल्यवान वस्तू लुटण्याच्या घटना घडल्या होत्या.
रेल्वे पोलीस त्यांचा शोध घेत होते. रविवारी रेल्वे पोलिसांना या टोळीतील काही सदस्य जामखेड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने व सिग्नल तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जवळ-जवळ या टोळीकडून वेगवेगळ्या ठिकाणच्या रेल्वेमधील २५ ते ३० गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या टोळीने साताºयामध्ये रहिमतपूर, सालपे, आदर्की, पळशी, शेणोली या ठिकाणी गाडी आडवून चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्यांचे तीन ते चार साथीदार फरार झाले आहेत.
आरपीएफचे प्रधान सुरक्षा आयुक्त मुंबई ए. के. श्रीवास्तव, मुख्य सुरक्षा आयुक्त आलोक बोहरा, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त पुणे डी. विकास, सह. सुरक्षा आयुक्त मकरारिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अजय एन. संसारे, हवालदार शहाजी जगताप, कॉ. विजय पाटील कॉ. पंकज डेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.