शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

सातारा : सोन्या-चांदीच्या ऐवजावर डल्ला तर मारलाच, अंगणातील कारही नेली चोरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 3:51 PM

घरातील सोन्या-चांदीच्या ऐवजावर डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी जाताना अंगणात असलेली कारही चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास तामजाईनगरमध्ये घडली.

ठळक मुद्देसोन्या-चांदीच्या ऐवजावर डल्ला तर मारलाचअंगणातील कारही नेली चोरून

सातारा : घरातील सोन्या-चांदीच्या ऐवजावर डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी जाताना अंगणात असलेली कारही चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास तामजाईनगरमध्ये घडली.तुकाराम बापू चव्हाण हे तामजाईनगर येथील अभिनव कॉलनीमध्ये कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास आहेत. ते मूळचे खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोलीचे आहेत. मंगळवारी सकाळी ते कुटुंबीयांसमवेत बाहेर गेले होते.

हीच संधी साधून मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सोन्याची साखळी, बदाम, चार अंगठ्या, गंठण, बोरमाळ, सात चांदीची नाणी चोरल्यानंतर चोरटे घराबाहेर आले. त्यानंतर घरासमोर लावलेली एमएच १२ डीएस ३२६६ ही कार चोरट्यांनी घेऊन पलायन केले.चव्हाण कुटुंबीय परत आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. चोरट्यांनी सुमारे १ लाख ६१ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर