सातारा : धावत्या कारचा दरवाजा उघडला, चारभिंतीवरील प्रकार, दैव बलवत्तर म्हणून चौघे बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:41 PM2018-02-26T12:41:18+5:302018-02-26T12:41:18+5:30
चारभिंतीवरून शाहूनगरमध्ये जाणाऱ्या धावत्या कारचा अचानक दरवाजा उघडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून चौघांचे प्राण वाचले. ही घटना रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली.
![Satara: The door of the moving car opened, the four-faced type, the fortress fortress survived | सातारा : धावत्या कारचा दरवाजा उघडला, चारभिंतीवरील प्रकार, दैव बलवत्तर म्हणून चौघे बचावले Satara: The door of the moving car opened, the four-faced type, the fortress fortress survived | सातारा : धावत्या कारचा दरवाजा उघडला, चारभिंतीवरील प्रकार, दैव बलवत्तर म्हणून चौघे बचावले](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/accident_20171128130.jpg)
सातारा : धावत्या कारचा दरवाजा उघडला, चारभिंतीवरील प्रकार, दैव बलवत्तर म्हणून चौघे बचावले
सातारा: चारभिंतीवरून शाहूनगरमध्ये जाणाऱ्या धावत्या कारचा अचानक दरवाजा उघडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून चौघांचे प्राण वाचले. ही घटना रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली.
चारभिंती परिसरात रविवारी सुटी असल्याने फिरण्यासाठी अनेकजण येत असतात. दुपारी एकपर्यंत चारभिंती परिसरात युवक-युवतींची गर्दी होती. दरम्यान, चारभिंतीवरून एक कार शाहूनगरकडे निघाली होती. त्या कारमध्ये चार युवक बसले होते. तीव्र उतारावरील वळणावर चालकाच्या बाजूला असलेला दरवाजा अचानक उघडला गेला.
चालकाने सीटबेल्ट न लावल्यामुळे त्याचा तोल गेला. मात्र, त्याने धावत्या कारमध्येच जमिनीवर हात टेकून कारचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डाव्या बाजूला कार थांबली. जमिनीवर हात घासत गेल्याने त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. शेजारी उजव्या बाजूला मोठी दरी होती.
चालकाने प्रसंगावधान दाखवून कार डाव्या बाजूला नेऊन उभी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दैव बलवत्तर म्हणूनच या चौघांचेही प्राण वाचल्याची चर्चा चारभिंती परिसरात होती.