Satara Doctor Death: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे फलटण परिसरात तसेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत असलेली महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका वादामध्ये अडकल्या होती. तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीमुळे महिला डॉक्टर मोठ्या मानसिक तणावाखाली होती. त्यानंतर महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं.
महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन 'माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन' असा स्पष्ट इशारा दिला होता. मात्र, या गंभीर इशाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद न मिळाल्याने, अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने आपले आयुष्य संपवले. रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागला आहे.
मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने हातावर आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहील्याचे म्हटलं जात आहे. पीएसआय गोपाल बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं या महिलेने हातावर नमूद केलं आहे. आपल्यावर बलात्कार झाला असं मृत डॉक्टरच्या असा मजकूर लिहिलेला आढळला आहे. "माझ्या मरण्याचे कारण PSI गोपाल आहे. त्याने माझा चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला ४ महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला," असं या महिला डॉक्टरच्या हातावर लिहील्याचे आढळून आले आहे.
"मला आत्तापर्यंत या घटनेचे अधिकृत कारण अधिकाऱ्यांकडून कळलेले नाही. मी पोलीस अधिक्षकांशी बोललो आहे की, तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जा. तेथे सुसाईड नोट वगैरे काही आढळली असेल तर ते अत्यंत खेदजनक आहे. या प्रकरणात खोलवर तपास करू. या प्रकरणातील सर्व पुरावे गोळे करू. मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचा अजून कोणावर संशय असेल तर त्यांची देखील माहिती घेऊ. या घटनेत जो कोणी दोषी असेल तरी त्याला सोडले जाणार नाही. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल," अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
दरम्यान, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि याचा तपास देखील पोलीस करणार आहेत, अशी माहिती दिली.
Web Summary : A doctor in Satara committed suicide, alleging rape and harassment. She named a PSI, Gopal Badne, accusing him of repeated rape and another person, Prashant Bankar, of causing mental distress in a note on her hand before taking her life.
Web Summary : सतारा में एक डॉक्टर ने बलात्कार और उत्पीड़न का आरोप लगाते हुए आत्महत्या कर ली। उसने अपनी मौत से पहले हाथ पर एक नोट में पीएसआई गोपाल बदने पर बार-बार बलात्कार करने और प्रशांत बनकर पर मानसिक पीड़ा पहुंचाने का आरोप लगाया।